बायकोला शिवीगाळ केली, अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणी गुन्हा दाखल

पुण्यात चोरट्यांचा हैदोस, महिलांचे दागिने हिसकावले

सावकारी आणि अ‍ॅट्रॉसिटीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – व्याजाने पाच लाख घेऊन त्याचे व्याज २ लाख १० हजार देऊनही त्रास देत जातीवाचक शिवीगाळ केली. आरोपीने पैसे नसतील तर बायकोला दुसर्‍या धंद्यात घाल अशा पध्दतीने अश्लिल बोलत मनास लज्जा होईल असे वर्तन केले. याप्रकरणात सावकारी करणार्‍यावर सावकारी आणि अ‍ॅट्रॉसिटीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल लक्ष्मण काळभोर (रा. तरवडी, रानमळा, लोणी काळभोर) आणि विशाल विठ्ठल काळभोर (रा. सिद्राम मळा, लोणी काळभोर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका ४७ वर्षीय अनुसुचित जातीच्या महिलेनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार २०२० ते ८ ऑगस्ट २०२५ दरम्यान घडला.

पुण्यात अमली पदार्थाची तस्करी जोमात, ७६ लाखांचे मेफेड्रॉन जप्त – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या पतीने त्यांच्या दुकानाच्या नुतनीकरणासाठी आरोपी राहुल काळभोर याच्याकडून २०२० मध्ये पाच लाख रूपये ४ टक्के व्याजाने घेतले होते. त्यांनी राहुल काळभोर याचे पैसे २ लाख १० हजार व्याजाच्या स्वरूपात परत केले होते. तरी आरेापी तक्रारदाराच्या कुटुंबियांना त्रास देत होते. एकदा आरोपींनी तक्रारदारांच्या मुलाची बुलेट अडवून त्याची चावी काढून घेत पैशाची मागणी केली. त्यानंतर दि. ८ ऑगस्ट रोजी आरोपींनी त्यांची कार तक्रारदाराच्या दुकानाला आडवी लावून त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली.

तसेच आम्हाला शहाणपण शिकवता काय असे म्हणून अपमानीत केले. यावेळी तक्रारदाराचे पती त्यांना समजावुन सांगत असताना राहुल काळभोर याने तुझ्याकडे पैसे नसतील तर तुझ्या बायकोला दुसर्‍या धंद्यात घाल असे अश्लिल भाषेत बोलून स्त्री मनास लज्जा होईल असे कृत्य केले. या सर्व प्रकारानंतर तक्रारदार महिलेनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे.

शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

शिवीगाळीचा व्हिडीओ रॅकॉडींक करून पाठविल्याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुक्तार गफार सय्यद (५०, रा. जुना मेहरून रोड, जळगाव) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत एका ५० वर्षीय महिलेनी तक्रार दिली आहे. आरोपीने फिर्यादी महिलेला व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हिडीओ पाठविला. त्याने तक्रारदाराच्या पतीला अश्लिल भाषेत शिवीगाळ केली. हा प्रकार ३१ जुलै रोजी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास घडला.

दोघांना साडे नऊ लाखांचा गंडा

घराच्या इंटिअरचे काम करून देण्याच्या बहाण्याने दोघांना साडे नऊ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी महिलेवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणी सागर हडके (रा. राजगड हाईट्स, शिवप्रसाद नगर, आंबेगाव, बुद्रुक) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत इशिता सुशिल मुजुमदार (३७, रा. अद्विका अपार्टमेंट, पिसोळीरोड कोंढवा बुद्रुक) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २०२३ ते ऑगस्ट २०२५ दरम्यान घडला. आरोपी महिलेनी तक्रार इशिता यांच्या घराचे इंटेरिअरचे काम करून देते असे सांगून त्या बदल्यात त्यांच्याकडून वेळोवेळी सहा लाख रूपये घेत त्यांची फसवणूक केली. तर बिबवेवाडी येथील कांबळे वस्ती परिसरात राहणार्‍या दिपाली सुरेश धिमधिमे यांची देखील अशाच पध्दतीने ३ लाख ५० हजार रूपये घेऊन फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

अपघातात तरूणाचा मृत्यू

संगमवाडी ते सादलबाबा चौकाकडे जाणार्‍या रस्त्यावर दुचाकीवर जात असताना कोणत्यातरी अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तरूणाचा मृत्यू झाला. उमेश उत्तमराव बलांडे (२९, रा. चर्‍होली खुर्द, आळंदी, पुणे) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. या अपघातत पल्लवी नावाची महिला ही देखील जखमी झाली. यावेळी अपघात करणारे वाहन उमेश बलांडे यांना दवाखान्यात दाखल न करताच निघून गेले. याबाबत उमेश यांचे साडू अननाथ अश्रोबा रोडे (३२, रा. गनराज हाईट्स खोपडेनगर, कात्रज) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा अपघात १० ऑगस्ट रोजी घडला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×