विश्रांतवाडी पोलिसांनी केली अटक
marathinews24.com
पुणे – शाळकरी मुलीला आमिष दाखवून तिच्या बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी एकाला अटक केली.
मुनाकिब नासीर अन्सारी (वय १८, रा. संजय पार्क, विमाननगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अन्सारी याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायदा (पोक्सो), तसेच बलात्कार केल्याप्रकरणी अन्सारी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युवतीला धमकावून केला बलात्कार – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १४ वर्षीय मुलगी एका शाळेत शिक्षण घेत आहे. आरोपी अन्सारीने मुलीला शाळेत सोडण्याचे आमिष दाखवून तिला जाळ्यात ओढले. तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर त्याने गाडीवर शाळेत सोडतो, असे सांगून एका खोलीत नेले. त्याने तिच्यावर बलात्कार केला. घाबरलेल्या मुलीने या घटनेची माहिती आईला दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अन्सारीला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत.




















