युवतीला धमकावून केला बलात्कार

पुण्यातील चंदननगर भागात अल्पवयीन मुलींवर बलात्कार

विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – युवतीला धमकावून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका १७ वर्षीय युवतीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आदित्य जनार्दन बेले (वय २०, रा. कलवड वस्ती, धानोरी, विश्रांतवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पुण्यातील नवले ब्रिजजवळ पुन्हा अपघात – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेले आणि युवीतीची ओळख झाली होती. त्याने युवतीशी मैत्री केली. सुरुवातीला युवतीने मैत्री करण्यास नकार दिला होता. युवतीच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी त्याने दिली. त्यानंतर त्याने युवतीची छायाचित्रे मोबाइलवर काढली. छायाचित्रे समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन त्याने युवतीवर बलात्कार केला. बेले याच्या धमकीमुळे घाबरलेल्या युवतीने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक देवतळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×