Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

सराफी पेढीतून सोन्यची अंगठी लांबविणारा अटकेत

कोथरूडमध्ये १७ वर्षीय मुलाच्या खुनाचा दोन तासांत छडा

विमानतळ पोलिसांनी केली अटक 

marathinews24.com

पुणे – खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून एक लाखांची सोन्याची अंगठी लांबविणाऱ्या एकाला विमानतळ पोलिसांनी अटक केली. विमाननगर भागातील एका प्रसिद्ध सराफी पेढीत ही घटना घडली. सैफ दिलीप बेळगावकर (वय २९, रा. केदारेनगर, वानवडी) याला अटक करण्यात आली. याबाबत सराफी पेढीतील कर्मचाऱ्याने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

खडकवासला भागात फ्लॅटचे कुलूप तोडून ऐवज चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर भागात प्रसिद्ध सराफी पेढी आहे. २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास बेळगावकर सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने आला. सराफी पेढीतील कर्मचाऱ्याला सोन्याची अंगठी दाखविण्यास सांगितले. त्यानंतर सराफी पेढीतील बेळगावकरला सोन्याची अंगठी दाखविली. सराफी पेढीतील कर्मचाऱ्याला बोलण्यात गुंतवून बेळगावकरने बनावट सोन्याची अंगठी ट्रेमध्ये ठेवली. त्याऐवजी एक लाख रुपयांची सोन्याची अंगठी चोरली. त्यानंतर अंगठी पसंत नसल्याचे सांगून बेळगावकर सराफी पेढीतून बाहेर पडला.

बेळगावकरने अंगठी ठेवण्याच्या ट्रेमध्ये बनावट सोन्याची अंगठी ठेवल्याचे तपासणीत उघड झाले. पोलिसांना या घटनेची माहिती कळविण्यात आली. पोलिसांनी सराफी पेढीतील चित्रीकरण तपासले. पसार झालेल्या बेळगावकरला पोेलिसांनी अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, गुन्हे शाखेचे निरीक्षक शरद शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन राठोड आणि पथकाने ही कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक राठोड तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×