Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

तरुणीला धमकावून बलात्कार करणारा अटकेत

फुरसुंगी पोलिसांनी केली अटक

marathinews24.com

पुणे – प्रेमप्रकरणाची माहिती कुटुंबीयांना देण्याची धमकी देऊन तरुणीवर बलात्कार करणाऱ्या एकाला फुरसुंगी पोलिसांनी अटक केली. आरोपीने तरुणीला वेळोवेळी धमकावून तिच्याकडून सोन्याचे दागिने घेतल्याचे उघडकीस आले.

पुण्यात बुलेटराजा कारवाईच्या तडाख्यात – सविस्तर बातमी

नील भरत निंबाळकर (वय १९, रा. अष्टविनायक सोसायटी, फुरसुंगी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रादार तरुणी ही मित्रासोबत रिक्षातून निघाली होती. आरोपीने तिला रिक्षातून जाताना पाहिले होते. त्यानंतर आरोपी निंबाळकरने तरुणीला धमकाविण्यास सुरुवात केली. एका तरुणाबरोबर तिचे प्रेमप्रकरण सुरू असून, कुटुंबीयांना माहिती देतो, अशी धमकी त्याने दिली. त्यानंतर त्याने तरुणीला धमकावून तिच्यावर बलात्कार केला. तरुणीला धमकावून त्याने तिच्याकडून दागिने घेतले. त्यानंतर आरोपीने तरुणीला पुन्हा धमकाविण्यास सुरुवात केली. त्याच्या धमकीमुळे घाबरलेल्या तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. निंबाळकर याला अटक करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक नलावडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×