Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

वादातून मित्राचा कालव्यात ढकलून केला खून

प्रेम, धमक्या अन आत्‍महत्‍या; फाटलेल्या चिठ्ठीतून उलगडला महिलेवरील अन्याय

हडपसरमधील घटना उघडकीस, वर्षभरानंतर गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पार्टी करताना झालेल्या वादातून दोघांनी मित्राला वाहत्या पाण्यात ढकलून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. गेल्या वर्षी हडपसर भागात ही घटना घडली असून, याप्रकरणी हडपसर पोलिसांनी तपास करुन दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

जेईई’चे वर्ग बंद करून विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक – सविस्तर बातमी

विनोद मधुकर शार्दुल (वय ४५, रा. हडपसर) असे खून झालेल्याचे नाव आहे. वैभव मनोज जाधव (वय ४२, छत्रपती संभाजीनगर) आणि अशिष यांच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार (वय ३६) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी माहितीनुसार, विनोद, वैभव आणि अशिष हे हडपसर भागातील उन्नतीनगर परिसरातील कालव्याजवळ ४ मे २०२४ रोजी पार्टी करण्यासाठी गेले होते. तिघांनी तेथे दारु प्यायल्यानंतर त्यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाला. त्यामुळे आरोपी वैभव आणि आशिष त्यांनी विनोदला वाहत्या पाण्यात टाकून दिले. पाण्यात बुडून विनोदचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुरुवातीला हडपसर पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती.

विनोद यांच्या पत्नीने पतीचा खून झाल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी याप्रकरणात दोघांची चौकशी केली. वैद्यकीय तज्ज्ञांनी याबाबतचा अहवाल पोलिसांकडे सादर केला. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×