Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

पैशांच्या वादातून पोटात खुपसला चाकू

वाघोलीतील घटना, तिघांना अटक

marathinews24.com

पुणे – विहीर खोदकाम मजुरीचे पैसे दिले असतानाही टोळक्याने संबंधित तरूणाचा मोबाइल हिसकावून नेला. याप्रकरणी महिलेसह तरूण मोबाइल आणण्यासाठी गेले असता, एकाने तरूणाच्या पोटात चाकू खुपसून गंभीररित्या जखमी केले आहे. ही घटना १६ जानेवारीला दुपारी एकच्या सुमारास वाघोलीतील बाजारतळासमोर घडली आहे. याप्रकरणी वाघोली पोलिसांनी टोळक्याला अटक केली आहे.

देशी बनावटीच्या पिस्तुलांची विक्री; तिघे गजाआड – सविस्तर बातमी

किरण मुरकुटे (वय ४०, रा. आष्टी, बीड) असे गंभीररित्या जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी राज श्ािंदे (वय २१) दीपक शिंदे (वय ४८) प्रेम शिंदे (वय २४) यांना अटक करण्यात आली आहे. तर आकाश शिंदे (वय २५, सर्व रा. वाडेबोल्हाई ता. हवेली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. नंदाबाई रघुनाथ मुरकुटे (वय ७४ )यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार नंदाबाई मुरकुटे यांचा मुलगा किरण आणि आरोपींमध्ये पैशांवरून वादविवाद होते. किरणने विहीर खोदकामाचे पैसे दिले असतानाही, आरोपींनी त्याला मारहाण करून १५ हजारांचा मोबाइल हिसकावून नेला होता. त्यानंतर नंदाबाई आणि किरण हे आरोपींकडून मोबाइल आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी राज शिंदे याने किरणच्या पोटात चाकू खुपसला. त्याला गंभीररित्या जखमी केले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शहादेव हवाले तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×