देशी बनावटीच्या पिस्तुलांची विक्री; तिघे गजाआड

देशी बनावटीच्या पिस्तुलांची विक्री; तिघे गजाआड

गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाची कामगिरी

marathinews24.com

पुणे – देशी बनावटीच्या पिस्तुलांची खरेदी-विक्री करणाऱ्या सराइतांविरुद्ध गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने कारवाई केली. कारवाईत ३ पिस्तुले आणि १३ काडतुसे जप्त करण्यात आली. गौस ऊर्फ निहाल गब्बर मोमीन (वय ३६, आझाद काॅलनी, मिरज, जि. सांगली) तसेच पिस्तूल खरेदी करणारे अजय अरुण गायकवाड (वय २७), सुनील नागेंद्र जमादार (वय १९, दोघे रा. म्हाळुंगे इंगळे, ता. खेड, जि. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

डाॅक्टरांचे अपहरण करुन उकळली १९ लाखांची खंडणी – सविस्तर बातमी 

शहरात बेकायदा देशी बनावटीच्या पिस्तुलांची खरेदी आणि विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पिस्तूल बाळगणाऱ्या सराइतांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले आहेत. महापालिका निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (१६ जानेवारी) गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत होते. गौस हा पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर तपास पथकाने सापळा लावून गौसला ताब्यात घेतले, त्याच्याकडून पिस्तूल खरेदी करणारे गायकवाड आणि जमादार यांना अटक केली. त्यांच्याकडून तीन पिस्तुले, १३ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. गौस अणि गायकवाड यांच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक छगन कापसे, उपनिरीक्षक अभिजित पवार, शशिकांत नाळे, गणेश माने, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, प्रमोद टिळेकर, अकबर शेख, राहुल ढमढेरे यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×