Breking News
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व डिजिटल मिशनच्या राष्ट्रीय ‘चिंतन शिबीराला पुण्यात प्रारंभपुण्यात नक्षलवादी कमांडर हिडमा माडवीच्या गाण्यावर नाचमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसचा कोनशिला समारंभ संपन्नपंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चितळे बंधू व्हिजन पार्कचे उद्घाटनदेऊळ बंद २” च्या पोस्टरने जिंकली प्रेक्षकांची मनेपुण्यात एमडी ड्रग्जची विक्री रॅकेट उघडकीसप्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेच्यामाध्यमातून गर्भवती महिलांना मोठा दिलासाबसच्या धडकेत तरूण ठार, पिसोळीतील घटनासंयुक्त जयंती महोत्सव 2026 : बोपोडीत भीमगीतांनी रंगली सांस्कृतिक मैफल

पॅरा एडिशनमध्ये मनीष नरवालची सुवर्ण कामगिरी..!

खेलोत्सव पॅरा एडिशन २०२५ दिवस चौथा

marathinews24.com

पुणे – खेलोत्सव पॅरा एडिशन २०२५ च्या चौथ्या दिवशी हरियाणाच्या मनीष नरवाल यांनी शानदार कामगिरी करत २२९.२ गुण घेत सुवर्णपदक पटकावले. श्री. शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बालेवाडी येथे सुरू असलेल्या खेलोत्सव पॅरा एडिशन २०२५ च्या चौथ्या दिवशी त्यांनी ही सुवर्ण कामगिरी केली.

महिलांची जोखीम ओळखण्याची क्षमता समाजसुरक्षेसाठी महत्त्वाची- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर – सविस्तर बातमी

मनीष यांनी P4 मिक्स्ड 50 मीटर पिस्तूल SH1 प्रकारात राजस्थानच्या रुद्रांश खंडेलवाल यांचा ०.७ गुणांच्या फरकाने पराभव केला. यामुळे रुद्रांश यांना २२९.२ गुणांसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले, तर हरियाणाच्या संदीप कुमार यांनी २०८.१ गुणांसह कांस्य पदकाची कमाई केली.

चौथ्या दिवशी खेळण्यात आलेली स्पर्धा अत्यंत चुरशीची राहिली. पहिल्या फेरीपासूनच मनीष नरवाल आणि रुद्रांश खंडेलवाल यांच्यात गुणांची चुरस दिसत होती. अखेरीस मनीष यांनी शेवटच्या सिरीजमध्ये उत्कृष्ट १०.४ पॉईंटची नेमबाजी करत आघाडी घेतली आणि सुवर्णपदक निश्चित केले.

इतर खेळाडूंमध्ये राजस्थानच्या निहाल सिंह यांनी १८६.० गुणांसह चौथा क्रमांक मिळवला. आर्मीच्या आमिर अहमद (१६३.६ गुण) पाचव्या स्थानावर राहिले, तर तामिळनाडूच्या संजय कुमार (१४२.० गुण) सहाव्या, उत्तर प्रदेशच्या आकाश (१२६.६ गुण) सातव्या आणि हरियाणाच्या सिंहराज (१०१.६ गुण) आठव्या क्रमांकावर राहिले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×