इंडो-जर्मन सहकार्याने मराठी चित्रपटाची होणार निर्मिती, रमेश होलबोले करणार दिग्दर्शन

इंडो-जर्मन भागीदारीतून मराठी सिनेसृष्टीत नवा अध्याय
रमेश होलबोले दिग्दर्शित चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले

Marathinews24.com

पुणे– मराठी चित्रपटसृष्टीत इंडो-जर्मन सहकार्याने पहिलाच चित्रपट लवकरच पडद्यावर येणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने चित्रपटाच्या पोस्टरचे सोशल मीडियावर अनावर केल्याची माहिती दिग्दर्शक रमेश होलबोले यांनी दिली आहे. चित्रपटासाठी कलाकारांची निवड झाली असून, येत्या ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांत महाराष्ट्रातील विविध शहरासह गावखेड्यात चित्रीकरण केले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळे २० पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक रमेश होलबोले हे चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

‘धिस साईड ऑफ पॅराडाईज’ असे चित्रपटाचे नाव असून, मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेल्या नामांकित दिग्गज कलाकार या चित्रपटात महत्वाची भूमिका बजावणार आहेत. हा चित्रपट दिग्दर्शकाच्या कारकिर्दीतच नव्हे तर संपुर्ण भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातही एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. दिग्दर्शक होलबोले यांचा मोठ्या पडद्यावरील हा पहिलाच चित्रपट असून, इंडो-जर्मन सहयोगातून तो पुर्ण होणार आहे. फोल्क्सफिल्म्स इंडिया प्रा. लि. आणि जर्मन निर्मिती संस्था लाइटिंग अँड थंडर यांच्यावतीने चित्रपट पुर्णत्वाकडे नेला जाणार आहे. सध्या चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शन झाले असून, लवकरच चित्रीकरणाला शुभारंभ केला जाणार आहे.

चित्रपटाविषयी थोडक्यात माहिती

दलित समाजातील मुलांचे शिक्षण, भौतिक गरजा पुर्ण करण्यासाठी होणारी ससेहोलपाट, कामाच्या शोधार्थ कुटूंबियाचे स्थलांतर, वाढत्या शहरीकरणात मजूरांचे असलेले स्थान, कामावेळी होणारे शोषण, समाजातील वाढलेली दरी, सर्वसामान्यांमध्ये मजूरांबाबत असलेले विचार यासह इत्भूंत अडी-अडचणींची मांडणी या चित्रपटातून मांडली जाणार आहे. प्रामुख्याने बेरोजगार तरूणावर आलेले आर्थिंक संकट, गावाकडून शहराकडे मार्गस्थ होताना झालेले हाल, शहरातील झगमगाट पाहून तरूणाची विसरून गेलेली स्वप्ने चित्रपटाद्वारे दाखविली जाणार आहेत.

बांधकाम मजुराचा लेक ते दिग्दर्शकपदी झेप

मराठवाड्यातील अतिशय दुर्लक्षित भागातून आलेले रमेश होलबोले हे बांधकाम मजूराचे पुत्र आहेत. अतिशय गरीब घरातून येउन त्यांनी हिरीरिने शिक्षण पुर्ण करीत कुटूंबातील पहिले पदवीधर झाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्यांनी पदवीचे शिक्षण पुर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी देशात नामांकित असलेल्या फिल्म अ‍ॅण्ड टेलीव्हिजन इस्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) संस्थेतून दिग्दर्शन आणि पटकथा लेखन या विषयात २०२० मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यानंतर जर्मनीतील फिल्म अकादमी बाडेन-वुर्टेमबर्ग येथे आंतरराष्ट्रीय शिक्षण घेतले आहे. सध्या ते फोल्क्सफिल्म्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रियपणे सहभाग आहे. तसेच चित्रपट निर्मितीच्या प्रतिभेने अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर त्यांनी २० हून अधिक पुरस्कार पटकावले आहेत. आगामी त्यांच्या पहिला चित्रपट वैशिष्ट्यपूर्ण असून, विविध सामाजिक समस्यावर उजेड टाकण्यास मदत करणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top