Breking News
Mobile Theft in Pune : नवले पुलाजवळ तरुणाचा मोबाइल हिसकावलाPune Bank Fraud Case : नियमबाह्य कर्ज प्रकरणात बँकेची ४ कोटी ४६ लाखांची फसवणूकPune Road Accident News : लोणी काळभोरमध्ये ट्रकवर मोटार आदळली; मोटार चालक मृत्युमुखीNavi Peth Crime News : आर्थिक व्यवहारातून तरुणाचा खुनाचा प्रयत्नWarje Crime News : गांजा विक्री करणारी महिला अटकेतMaharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्या

‘अहिरभैरव‌’, ‌‘ललत‌’, ‌‘परमेश्वरी‌’, ‌बिलासखानी ‘सारंग‌’चे सुमधुर सादरीकरण

पंडित हेमंत पेंडसे शिष्य परिवारातर्फे मैफलीचे आयोजन…

marathinews24.com

पुणे –  सुप्रसिद्ध गायक पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे ज्येष्ठ शिष्य पंडित हेमंत पेंडसे यांच्या शिष्य परिवारातर्फे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित प्रात:कालीन रागांच्या मैफलीत अहिरभैरव, ललत, परमेश्वरी, बिलासखानी तोडी आणि सारंग यांचे सुमधुर सादरीकरण झाले.

नृत्य हा लोकांतात केलेला योगच- नृत्यगुरू डॉ. स्वाती दैठणकर – सविस्तर बातमी

वारजे येथील ओव्हलनेस्ट सोसायटीच्या सभागृहात रविवारी या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.
दुबई येथील संगीतप्रेमी रसिक श्रीरंग कुलकर्णी यांच्या वतीने कै. मोरेश्वर यशवंत कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या पुरस्काराने युवा तबलावादक प्रणव मिलिंद गुरव यांचा गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण श्रीरंग कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. मानपत्र, अकरा हजार रुपये रोख, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

https://marathinews24.com/dance-is-yoga-performed-among-people-dance-guru-dr-swati-daithankar/

मैफलीची सुरुवात अनुराधा लेले यांनी राग अहिरभैरवमधील ‌‘हे लाल अलसाने’ या बंदिशीने केली. त्यानंतर द्रुत लयीत पं. हेमंत पेंडसे रचित ‌‘करम तुही करतार तु‌’ ही बंदिश सादर करून ‌‘मान रे मोरा मनवा तुम‌’ ही रचना सादर केली. संदिप देशमुख यांनी राग ललतमधील ‌‘रैन का सपना‌’ ही पारंपरिक रचना आपल्या मधूर आवाजात सादर केली तर ‌‘मारी घुंगरवा खेलनवा‌’ ही दृत लयीत सादर केलेली रचना रसिकांना विशेष भावली. पंडित अभिषेकीबुवा यांनी गायलेली राग परमेश्वरीमधील ‌‘मातेश्वरी परमेश्वरी‌’ ही बंदिश राधिका ताम्हनकर यांनी प्रभावीपणे सादर करून त्याला जोडून पंडित हेमंत पेंडसे यांनी रचलेला ‌‘दिर दिर तानुम्‌‍ त देरे ना‌’ हा तराणा सादर केला.

विशेष निमंत्रित गायक पंडित सचिन नेवपूकर (संभाजीनगर) यांनी आपल्या मैफलीची सुरुवात राग बिलासखानी तोडीतील ‌‘श्री कामेश्वरी‌’ या पारंपरिक बंदिशीने केली. दृत लयीत ‌‘जा जारे जा जा रे’ ही पारंपरिक रचना बहारदारपणे सादर केली. त्यानंतर सारंग रागातील ‌‘तुम रब तुम साहिब‌’ ही पारंपरिक तसेच ‌‘गगरी फोडी मोरी कान्हाने‌’ ही स्वरचित रचना सादर केली.

कार्यक्रमाची सांगता पंडित हेमंत पेंडसे यांनी सादर केलेल्या ‌‘सब सखिया समझाए‌’ या भैरवीने झाली. कलाकारांना अभिजित बारटक्के (तबला), आदिती गराडे (संवादिनी), रोहन देशपांडे, श्रावणी कुलकर्णी, यश कोल्हापुरे, संदिप देशमुख (तानपुरा, सहगायन) यांनी साथ केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली जोशी यांनी तर आभार प्रदर्शन प्राची बाब्रस यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×