Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

बारामतीत अल्पवयीन मुलीची छेड, घरच्यांनाही दिली मारण्याची धमकी

टोळक्यावर पॉस्को, विनयभंग, अ‍ॅट्रॉसिटी, मारहाणीचा गुन्हा

marathinews24.com

पुणे – अनुसुचित जातीच्या असलेल्या अल्पवयीन मुलीला रस्त्यात गाठून टोळक्याने तिचा विनयभंग केला. त्याच्या घरी सांगूनही पुन्हा तिची छेड काढत तिच्या घरच्यांना मारहाण केली. याप्रकरणी टोळक्यावर बारामती तालुका पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार, मारहाण तसेच अ‍ॅट्रॉसिटीच्या विविध कलामन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय बिबे, प्रविण अंकुश बिबे, अशोक बिबे आणि नितेश बिबे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पिडीत मुलीच्या २४ वर्षीय भावाने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बालेवाडी, पाषाण, सुस येथे महारक्तदान शिबिर संपन्न – सविस्तर बातमी

तक्रारदार यांची चुलत बहीण ही अल्पवयीन असून बारामतीतील एका गावात आपल्या कुटुंबासोबत राहते. ती बारामतीतील प्रसिध्द कॉलेजमध्ये जाते. एक दिवशी कॉलेजला जात असताना मुलगी बसची वाट पाहत असताना आरोपी प्रविण बिबे याने तिची छेड काढून तिचा विनयभंग केला. याबाबत मुलीच्या घरच्यांनी याबाबत त्याच्या घरच्यांना सांगितल्यावर त्यांनीही त्याची समजूतन काढतो असे सांगितले. तर मुलीच्या घरच्यांनीही तिच्या मनातील भिती बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

याप्रकारानंतरही १० जुलैला दुपारी मुलगी घरी येत असताना आरोपीने तिला रेल्वेत गाठून प्रविण तिला प्रपोज केले. तसेच त्याने तरूणीला तु माझ्यावर प्रेम केले नाही तर तुझ्या घरातील कोणाला तुझी मदत करण्याकरीता ठेवत नसतो, तुझ्या घरातील एकएकाचे हात पाय मोडून टाकतो अशी धमकी दिली.

मुलीने झालेला प्रकार घरी सांगितला. दरम्यान २० जुलै रोजी अकरा वाजण्याच्या सुमारास दुकानात गेलेल्या तक्रारदाराच्या आतेभावाला आरोपी टोळके लाठ्या काठ्याने मारहाण करत असल्याचा फोन आला. ते पोहचल्यावर तक्रारदाराने मारहाण का करत आहात अशी विचारणा केल्यावर प्रविण बिबे आणि विशाल गोरे याने तक्रारदारांच्या घराच्या काचा फोडल्या.

त्यामुळे आतेभावाला सोडविण्यासाठी गेलेल्या तक्रादाराला बांबुने आरोपीने मारहाण केली. तसेच तक्रारदाराच्या आतेभावाला गावातील प्रसिध्द मंदिराच्या पुलाजवळ नेले. यावेळी तक्रारांच्या घरचे भांडणे सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करून विटेने मारहाण केली. तसेच आरोपींनी तुम्हाला सगळ्यांना संपवून टाकेन अशी धमकी दिली. गुन्ह्याचा पुढील तपास बारामती पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

मित्राला भेटायला आला अन जाळयात सापडला, फरारी अल्पवयीन ताब्यात

मित्राला भेटायला आल्यामुळे वर्षापासून फरार असलेला मोक्कामधील खुनाचा प्रयत्नासारखा गंभीर गुन्ह्यातील पाहीजे अल्पवयीनाला गुन्हे शाखेच्या युनीट एकने ताब्यात घेतले आहे. जुन्या भांडणाच्या रागातून टोळक्याने २२ जुलै २०२४ रोजी एकावर खुनी हल्ला केला होता. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यापुर्वी संबंधित गुन्ह्यात ६ आरोपींना अटक केली होती. इतर निष्पन्न आरोपी फरार झाले होते.

गुन्हे शाखेच्या युनीट एकमधील अधिकारी-पोलीस अमलदार मोक्कातील पसार आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार निलेश साबळे व शुभम देसाई यांना अल्पवयीन आरोपी नाना पेठेत मित्राला भेटायला येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून त्याला २२ जुलैला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. ही कामगिरी अपर आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, एसीपी राजेंद्र मुळीक, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, एपीआय दिपक बर्गे, विनोद शिंदे, निलेश साबळे, शुभम देसाई यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×