Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

मोक्का’ कारवाईत एक वर्ष फरार असलेला अल्पवयीन ताब्यात

मोक्का’ कारवाईत एक वर्ष फरार असलेला अल्पवयीन ताब्यात

गुन्हे शाखेची कारवाई

marathinews24.com

पुणे – मोक्का’ कारवाईत एक वर्ष फरार असलेला अल्पवयीन ताब्यात – महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केल्यानंतर फरार झालेल्या अल्पवयीनाला गुन्हे शाखेच्या युनिट एकने नाना पेठ परिसरातून ताब्यात घेतले. मंगळवार पेठेतील मोदी पेट्रोल पंपाजवळ गेल्या वर्षी २२ जुलै टोळक्याने तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खुनाचा प्रयत्न केला होता. खुनाचा प्रयत्न करणारे आरोपी सराइत होते. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी कारवाई करुन सहा जणांना अटक केली होती. सराइतांविरुद्ध ‘मोक्का’ कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते.

आमदाराच्या भावानेच केला कला केंद्रात गोळीबार – सविस्तर बातमी 

कारवाई केल्यानंतर सराइतांबरोबर असलेला अल्पवयीन साथीदार पसार झाला होता. गेले वर्षभर तो पोलिसांना सापडला नव्हता. पसार झालेला अल्पवयीन नाना पेठेत एका मित्राला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकमधील पोलीस कर्मचारी नीलेश साबळे आणि शुभम देसाई यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. अल्पवयीनाला फरासखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, सहायक निरीक्षक दीपक बर्गे, विनोद शिंदे, नीलेश साबळे, शुभम देसाई यांनी ही कारवाई केली.

मार्केट यार्ड भागातून दुचाकी चोरणारा अटकेत

मार्केटयार्ड भागातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. चोरट्याकडून दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
राज परमेश्वर कदम (वय २६, रा. लक्ष्मीनगर, पर्वती) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. मार्केट यार्ड भागातून दुचाकी चोरण्यात आली होती, चार दिवसांपूर्वी एका वृत्तपत्राच्या कार्यालयासमोरुन दुचाकी चोरीला गेली होती. याप्रकरणी दाखल गुन्ह्यांचा तपास स्वारगेट पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. तपासात कदम याने दुचाकी चोरल्याची माहिती गस्त घालणाऱ्या तपास पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून कदम याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद माेहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम, पोलीस निरीक्षक विकास भारमळ, सहायक निरीक्षक अभिजीत पाटील, उपनिरीक्षक रवींद्र कस्पटे, पोलीस कर्मचारी अश्रृबा मोराळे, हर्षल शिंदे, हनुमंत दुधे, फिरोज शेख, सुजय पवार, रमेश चव्हाण, दीपक खेंदाड यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×