लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी १ लाख ५३ हजारांचे जुने नवे मोबाईल फोन, अॅक्सेसिरीज व इतर साहित्य चोरी करून नेले. हा प्रकार डोंगरगाव येथील वाघमारे वस्ती येथे दि. २१ आगस्टच्या रात्री घडला. त्यानंतर याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सौरभ संदिप वाघमारे (२४, रा. वाघमारे वस्ती, डोंगरगाव, ता. हवेली, जि. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फ्लॅटमधून साडेआठ लाख रुपयांचे दागिने चोरणारा रखवालदार अटकेत – सविस्तर बातमी
जुन्या भांडणाच्या कारणावरून मारहाण
जुन्या भांडणाच्या कारणावरून मारहाण केल्याप्रकरणी लोणीकाळभोर पोलिसांनी दहा ते १५ जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल केला. हा प्रकार दि. २२ ऑगस्ट रोजी लोणी काळभोर गावच्या कुस्ती आखाडा लगतच्या रोडवर हा प्रकार घडला. शंतनु धुमाळ (रा. धुमाळमळा, कुंजीरवाडी), तेजस काळभोर, शुभम विरकर, साहिल कोल्हे (तिघेही रा. रायवाडी, लोणी काळभोर) यांच्यासह दहा ते पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शुभम पोपट काळभोर (रा. सिद्राममळा, लोणी काळभोर) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
महिलेचा विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल
विवाहित महिलेला घरी एकटेच पाहून तिच्या घराबाहेर जात तिच्याशी लगट करत विनयभंग केल्याप्रकरणी एकाला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली. मुबारक मोळम्मद शेख (२५, रा. घोरपडेवस्त, लोणी काळभोर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका २८ वर्षीय तरूणीने फिर्याद दिली आहे. दि. २२ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
तक्रारदार महिला खरात एकटीच असल्याचे पाहुन मुबारक तिच्या घराच्या बाहेर गेला. तिला जवळीव लगट साधण्याच्या हेतुन त्याने तीला मी तुला पहील्यांदा पाहिले तेव्हापासून तु मला खूप आवडत आहे. असे बोलुन लगट करण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरोपीच्या या सर्व प्रकाराला नकार दिल्यानंतर आरोपीने तिला तु फक्त सांग मी, तुझ्यासाठी काय करू, तुझ्या नवर्याला घरात घुसुन मारतो व तुला उचलुन घेऊन जातो. अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपी घरामध्ये शिरला आणि तिचा विनयभंग केला.
विवाहितेवर लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल
पुणे – विवाहित महिलेशी जवळीक साधून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकावर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुलै २०२५ ते १९ ऑगस्ट २०२५ दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी जियान नावाच्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेनी पोलिसांत तक्रार दिली आहे. महिलेनी आरोपीला विरोध केल्यानंतरही आरोपीने जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
जमीनीवर ताबामारी, १९ जणांवर गुन्हा
सात बारा उतार्यावरील नावे कमी झालेली नाहीत याचा गैर फायदा घेवुन वर्धमानच्या ग्रुपच्या आरोपीसह बेकायदेशिर दस्त बनवून ताबा मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात लष्कर पोलिस ठाण्यात १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जितेंद्र सुन्दरदास पंजाबी यांच्यासह १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राहुल राजीव अरोरा (५१, रा. सिरोना बाणेर हिल्स) यांनी लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ६ सप्टेंबर २०२१ ते ऑगस्ट २०२५ दरम्यान हा प्रकार घडला. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सुहास पाटिल करत आहेत.
सायबर चोरट्यांकडून ३५ लाखांची फसवणूक
पुणे – शहरात घडलेल्या तीन गुन्ह्यात साडे पसत्तीस लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्क फ्रॉम होम देण्याच्या बहाण्याने ऑनलाईन व्यवहार करण्यास सांगून तब्बल १६ लाख ८४ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १७ जुले रोजी घडल्यानंतर एका ४० वर्षीय महिलेनी दिलेल्या तक्रारीवरून युपीआयडी व बँक खातेधारक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
८९ वर्षीय वृध्द नागरिकाला सायबर चोरट्यांनी ६ लाख ३६ हजारांची युपीआयद्वारे फसवणूक केल्याचा प्रकार घडला. हा प्रकार १५ मे ते २९ जुलै दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसर्या गुन्ह्यात पार्टटाईम जॉब करण्यासाठी लिंकमध्ये अकाउंट तयार करायला सांगुन ऑनलाईन १२ लाख ५७ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणात सायबर चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत घोरपडी येथील एका ५४ वर्षीय व्यक्तीने मुंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार २५ सप्टेंबर २०२४ ते ८ नोव्हेंबर २०२४ दरम्यान घडला.
बसमध्ये जेष्ठ महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी चोरीला
पुणे – बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेची सोन्याची बांगडी चोरी करून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शोभा उत्तमराव निंबाळकर (६०, मंगल हौसिंग सोसायटी, आळंदी रोड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगला थिअटर जवळील रामसर बेकरी जवळ २२ ऑगस्ट रोजी दुपारी दोन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दागिणे चोरी प्रकरणी गुन्हा
घरकाम करताना घरातील ४ लाख २० हजारांचे सोन्याचे दागिने चोरी करून नेल्याप्रकरणी दोघांवर संशयावरून अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रविण रूपचंद परदेशी व सुनिल शकिल रामगवळी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुवर्णा संदीप निर्मळ (५२, रा. कपिलअभिजात, डहाणुकर कॉलनी, कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे हा प्रकार १५ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट दरम्यान घडला.
तरूणाचा महागडा मोबाईल हिसकावला
मोबाईलवर बोलत वडगावशेरील टिंगरेनगर येथील लेन नंबर १३ येथून पायी निघालेल्या तरूणाचा महागडा मोबाईल हिसकाऊन नेल्याचा प्रकार विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आयुष दिपक जैन (२७, रा. सनराईज रेसिडेन्सी, टिंगरेनगर, विश्रांतवाडी) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार २२ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला.
तरूणाचा महागडा मोबाईल हिसकावला
पुणे – बेकायदेशिररित्या पिस्तुल बाळगल्याप्रकरणी एकाला गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. ओकांर पांडुरंग चरेकर (२०, रा. कोल्हेवाडी, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबत गुन्हे शाखेचे अमंलदार पुरूषोत्तम गुन्ला यांनी याबाबत तक्रार दिली आहे. युनिट ३ च्या पथकाला बेकायदेशिर पिस्तुल बाळगणारा संशयीत खडकवासला येथील धरणाजवळील कोल्हेवाडी येथील हॉटेल मेजवाणी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून पिस्तुल व जिवंत दोन जिवंत काडतुसे पकडले.
वेश्या व्यवसाय प्रकरणात गुन्हा दाखल
बेकायदेशिररित्या वेश्या व्यावसाय चालविणार्या वाघोली येथील हॉटेलवर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी हॉटेल चालकासह मालकावर वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेल चालक ज्ञानेश्वर निवृत्ती मोरे, प्रशांत शामराव शेट्टी (४६, रा. विजय श्री आपार्टमेंट, बालाजीनगर, कात्रज) आणि अंकुश गंगाधर मोरे (२२, रा. हॉटेल संगम रेसिडेन्सी, डब्ल्युएस बेकर्स, वाघोली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार वाघोली येथील डब्ल्युएस बेकर्सच्या शेजारी असलेल्या हॉटेल संगम रेसिडेन्सीमध्ये सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. २२ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
























