Breking News
Pune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआडAmit Shah Pune Visit Traffic Changes : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; वाहतूकीत बदलKothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळBharat Sasane Pune : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणेVishranti Hospital Pune : विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अ‍ॅडमिरल मनीष होनवाडPune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविलेKondhwa Flat Theft Pune : कोंढव्यात ८ फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्नPune Khadak Police Theft Case : २५ दिवसांत १० हजार किलोमीटरचा प्रवास करून उघडकीस आणला गुन्हाRaghoji Bhangare Freedom Fighter : सह्याद्रीच्या कपारीत गर्जना करणारा आदिवासींचा वाघ: राघोजी भांगरेSugarcane Trash Management : ढेकळवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana : उद्योग व व्यावसायिक आस्थापनांनी सहभागी होण्याचे आवाहन

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना; युवकांना रोजगारक्षम बनविण्याची संधी

marathinews24.com

पुणे – Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana : राज्यातील युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगारक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने राज्य शासनामार्फत ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत युवकांना सहा महिन्यांचे प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्यासाठी उद्योग व व्यावसायिक आस्थापनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सु. रा. वराडे यांनी केले आहे. या योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थींचा प्रशिक्षण कालावधी ११ महिने असून, या कालावधीत उमेदवारांना शासनामार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात विद्यावेतन जमा करण्यात येईल. उमेदवारांना मिळणारे विद्यावेतन त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार निश्चित करण्यात आले आहे.

रब्बी हंगामातील सात पिकांसाठी पीक विमा नोंदणी सुरू; शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे – सविस्तर बातमी 

उमेदवाराचे वय किमान १८ व कमाल ३५ वर्षे असावे. शैक्षणिक पात्रता बारावी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पदविका, पदवी किंवा पदव्युत्तर असावे. उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. उमेदवाराची आधार नोंदणी असावी व बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असावे. आस्थापना किंवा उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा. आस्थापनेची स्थापना किमान तीन वर्षांपूर्वी झालेली असावी. आस्थापनेची कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ), कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी), वस्तू व सेवा कर (जीएसटी), कंपनी नोंदणी प्रमाणपत्र, उद्योग आधार तसेच उद्योग संवर्धन व अंतर्गत व्यापार विभागाकडे (डीपीआयटी) नोंदणी असावी. जिल्ह्यातील ज्या औद्योगिक आस्थापनांमध्ये २० पेक्षा अधिक कर्मचारी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीअंतर्गत कार्यरत आहेत, अशा पात्र आस्थापनांनी या योजनेत सक्रिय सहभाग नोंदवून युवकांना प्रशिक्षणाची संधी द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक आस्थापनांनी (https://docs.google.com/forms/d/e/9FAIpQLSeHIUQ9hAtPYEYwOHkspMKvc/9UBWQfmr cDgJEgnk3AK_9zoQ/viewform?usp=dialog) भरून संमती द्यावी. योजनेच्या सविस्तर अटी, शर्ती, ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया व मार्गदर्शक सूचना https://www.cmykpy.mahaswayam.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

योजनेबाबत अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी इच्छुक आस्थापनांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१, रास्ता पेठ, पुणे येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष भेट द्यावी किंवा दूरध्वनी क्रमांक ०२०-२६१३३६०६ अथवा अतिष मांडगे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×