Breking News
पुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५

नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५

मतदान व मतमोजणी परिसरात १०० मीटर प्रतिबंधित क्षेत्र – जिल्हादंडाधिकाऱ्यांचा आदेश जारी

marathinews24.com

पुणे – पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ दरम्यान शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-२०२३ चे कलम १६३ अन्वये आदेश जारी केला आहे.

राष्ट्रीय शालेय जलतरण डायविंग क्रीडा स्पर्धा २०२५-२६ साठी महाराष्ट्र संघ रवाना – सविस्तर बातमी 

या आदेशानुसार मतदान व मतमोजणीच्या ठिकाणापासून १०० मीटर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या क्षेत्रात मतदारांव्यतिरिक्त इतर व्यक्तींना प्रवेश बंदी असून मतदान केंद्रावर २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० पासून मतदान पूर्ण होईपर्यंत तर मतमोजणी केंद्रावर ०३ डिसेंबर रोजी सकाळी ६.०० वाजेपासून मतमोजणी संपेपर्यंत निर्बंध लागू राहणार आहेत.

प्रतिबंधित परिघात वाणिज्यिक आस्थापना, मंडपे, दुकाने, फेरीवाले तसेच मोबाईल, कॉर्डलेस फोन, वायरलेस सेट, ध्वनिक्षेपक व विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरावर बंदी घालण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना मात्र सूट देण्यात आली आहे.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम व भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ अन्वये कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×