नात्यातील महिलेची छेड काढल्याने केला खून

कोथरूडमध्ये टोळक्याचा राडा, पुर्ववैमनस्यातून तरूणावर वार

चंदननगरमधील घटना; दोघे अटकेत

marathinews24.com

पुणे – नात्यातील महिलेची छेड काढल्याने केला खून – नात्यातील महिलेची छेड काढल्याने तरुणाला बेदम मारहाण करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना चंदननगर भागातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत घडली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी दोघांना अटक केली. साईनाथ उर्फ खलीबली दत्तात्रय जानराव (वय ३५, रा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, चंदननगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सोन्या उर्फ आदित्य संतोष वाल्हेकर (वय २१), समर्थ उर्फ करण पप्पू शर्मा (वय २१, दोघे रा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, चंदननगर) यांना अटक करण्यात आली. पोलीस हवालदार राहुल गिरमे यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

डॉ.आंबेडकर भवन शेजारील जमीन खासगी बिल्डरला देण्याचा निर्णय अखेर रद्द – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगर भागातील डाॅ. आंबेडकर वसाहतीत आरोपी वाल्हेकर, शर्मा आणि जानराव राहायला आहेत. जानराव याने आरोपींच्या नात्यातील महिलेची महिलेची छेड काढली होती. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता. मंगळवारी (१२ ऑगस्ट) रात्री साडेआठच्या सुमारास आरोपी वाल्हेकर, शर्मा यांनी जानराव याच्याशी पुन्हा वाद घातला. नात्यातील महिलेची छेड का काढली? असा जाब विचारला. आरोपींनी जानराव याला लाथाबुक्क्यांनी, तसेच हाॅकीस्टीकने बेदम मारहाण केली. मारहाणीत जानराव गंभीर जखमी झाला. आरोपी तेथून पसार झाला. गंभीर जखमी अवस्थेतील जानरावला रहिवाशांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

घटनेची माहिती मिळताच परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे, चंदननगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी धाव घेतली. जानराव याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. पसार झालेले आरोपी वाल्हेकर आणि शर्मा यांना पोलिसांनी रात्री उशीरा अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक विकास बाबर तपास करत आहेत.

कोरेगाव पार्क भागात अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू – दुचाकीस्वारासह टेम्पाे चालकाविरुद्ध गु्न्हा

मैत्रिणीसोबत निघालेल्या दुचाकीस्वार तरुणाला कोरेगाव पार्क भागात दुचाकीने पाठीमागून धडक दिली. अपघातानंतर रस्त्यात पडलेल्या दुचाकीस्वार तरु पाठीमागून येणाऱ्या भरधाव टेम्पोच्या चाकाखाली सापडल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी दुचाकीस्वार तरुणाला धडक देणाऱ्या दुचाकीस्वारासह टेम्पोचालकाविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

शिवम सिंग (वय २२, रा. एअरफोर्स स्टेशन, विमाननगर) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी दुचाकीस्वारासह टेम्पोचालक इंद्रजीत संजय नरोटे (रा. येवलेवाडी, कोंढवा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिवम सिंग याची बहीण नेहा (वय २०) हिने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार शिवम आणि त्याची मैत्रीण कोरेगाव पार्क भागातून मंगळवारी ( १२ ऑगस्ट) सकाळी साडेदहाच्या सुमारास निघाले होते. त्या वेळी पाठीमागून आलेल्या एका दुचाकीस्वाराने दुचाकीस्वार शिवमला धडक दिली. शिवमचे नियंत्रण सुटल्याने तो रस्त्यात पडला.

त्या वेळी पाठीमागून आलेल्या भरधाव टेम्पोने शिवमला धडक दिली. टेम्पोच्या चाकाखाली सापडल्याने शिवम गंभीर जखमी झाला. अपघातात त्याची मैत्रीण जखमी झाली. अपघातानंतर शिवम आणि त्याच्या मैत्रिणीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील थोपटे यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या टेम्पो चालकासह दुचाकीस्वाराचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ हंडाळ तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×