Breking News
Maharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

संगीत सौभद्र.. पाच तास.. ५६ नाट्यपदे.. टाळ्या अन्‌ प्रतिसाद

संगीत सौभद्र.. पाच तास.. ५६ नाट्यपदे.. टाळ्या अन्‌ प्रतिसाद

पद्मश्री जयमाला शिलेदार जन्मशताब्दी वर्षांनिमित्त कार्यक्रम संपन्न

marathinews24.com

पुणे – सांस्कृतिक वैभव असलेले बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारातील लक्ष वेधून घेणारी आकर्षक रांगोळी, रसिकांच्या चेहऱ्यावर दिसणारी उत्कंठा, तिसरी घंटा, भरजरी वस्त्रातील कलाकार आणि रसिकांमधील मखमली पडदा दूर होतो. ५६ नाट्यपदे, टाळ्या, वन्स मोअरची दाद देत पाच तास रंगलेला चार अंकी नाट्यप्रयोग रंगला होता. संगीत सौभद्र संगीत नाटकाच्या प्रयोगानिमित्ताने मराठी रंगभूमी, पुणे आणि गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्य सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री जयमाला शिलेदार यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने (दि. २४) अण्णासाहेब किर्लोस्कर लिखित संगीत सौभद्र नाटकाचा दीर्घ प्रयोग पार पडला.

रुग्णांची नेत्रविकार सेवा घडावी- उपमुख्यमंत्री अजित पवार – सविस्तर बातमी 

‌‘प्रिये पहा‌’, ‌‘लग्नाला जातो मी‌’, ‌‘राधाधर मधुमिलिंद जय जय‌’, ‌‘नच सुंदरी करू कोपा‌’, ‌‘पावना वामना या मना‌’, ‌‘बलसागर तुम्ही वीरशिरोमणी‌’, ‌‘पांडु नृपती जनक जया‌’, ‌‘पार्था तुज देऊन वचन‌’, ‌‘बहुत दिन नच भेटलो‌’, ‌‘लाल शालजोडी जरतारी‌’ अशा गाजलेल्या अनेक नाट्यपदांसह सहसा प्रयोगात घेतली न जाणारी ‌‘वसंती बघुनी मेनकेला‌’, ‌‘अति कोपयुक्त‌’, ‌‘तुज देऊनी वचने‌’, ‌‘माझ्यासाठी तिने‌’, ‌‘व्यर्थ मी जन्मले‌’, ‌‘पुष्पपराग सुगंधीत‌’ ही पदे देखील रसिकांना आज ऐकावयास मिळाली. प्रयोगाचे वैशिष्ट्य म्हणजे संगीत नाटक सादरीकरणादरम्यान जो सध्या होत नाही असा नटी सूत्रधाराचा प्रवेशही नाट्यप्रयोगात सुरुवातीस सादर झाला. नाटकाची सांगता भरतवाक्याने झाली. प्रयोगात रुक्मिणी आणि सुभद्रा प्रवेश हा देखील अनेक वर्षांनी सादर केला गेला.

पुणे शहरासह महाराष्ट्रातील अनेक संगीत नाटकप्रेमी रसिकांनी या दीर्घ प्रयोगास आवर्जून उपस्थिती लावली तर रसिकांमधील अनेक ज्येष्ठांनी जयमालाबाई शिलेदार यांनी सादर केलेला संगीत सौभद्रचा रंगलेला प्रयोग पाहिला होता. त्यातील एका रसिक महिलेने प्रयोग संपल्यानंतर रंगमंचावर येत भावनेने ओथंबलेल्या शब्दांनी आठवणींना उजाळा देत नव्या संचातील प्रयोगाचे कौतुक केले.

निनाद जाधव, चिन्मय जोगळेकर, भक्ती पागे, ज्ञानेश पेंढारकर, डॉ. धनश्री खरवंडीकर, ओंकार खाडिलकर, सुदीप सबनीस, वैभवी जोगळेकर, डॉ. ऋतुपर्ण पिंगळे, निरंजन कुलकर्णी, अनुपमा कुलकर्णी, अवंती बायस, सयाजी शेंडकर, चिन्मय पाटसकर, रमा जोगळेकर, राकेश घोलप, संतोष गायकवाड यांनी भूमिका साकारल्या. तर लीलाधर चक्रदेव (ऑर्गन), प्रमोद जांभेकर (व्हायोलिन), अभिजित जायदे (तबला) यांची समर्पक साथसंगत लाभली. दीप्ती शिलेदार-भोगले यांचे दिग्दर्शन होते तर वर्षा जोगळेकर यांनी संयोजन केले. लोकमान्य मल्टिपर्पजचे शाखा व्यवस्थापक श्रीकांत देशपांडे, सुरेश रानडे, जयश्री रानडे, दीप्ती शिलेदार-भोगले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन नाट्यप्रयोगाचा शुभारंभ झाला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×