Breking News
Maharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

के दिल अभी भरा नही’ ‘जोडी तुझी माझीमध्ये रंगली मैफल

के दिल अभी भरा नही’ ‘जोडी तुझी माझीमध्ये रंगली मैफल

आनंददायी मैफलीने रसिकांची दिवाळी पाडव्याची गोडी वाढविली

marathinews24.com

पुणे – खुमासदार, खुसखुशीस, खमंग किस्से तसेच मनमोकळ्या गप्पा आणि सुमधुर गाण्यांन पुणेकर रसिकांना दिवाळी पाडव्याची अनोखी भेट मिळाली. निमित्त होते सिने-नाट्यसृष्टीतील तारे-तारकांबरोबर दिलखुलास गप्पा आणि संसारातील गोडी खुलविणाऱ्या गीतांची विशेष मैफल ‌‘जोडी तुझी माझी‌’ या कार्यक्रमाचे. या आनंददायी मैफलीने रसिकांची दिवाळी पाडव्याची गोडी वाढविली. संवाद पुणे, पायलवृंद यांचे आयोजन आणि कलांगणची प्रस्तुती असलेल्या या कार्यक्रमात डॉ. गिरीश ओक आणि पल्लवी ओक तसेच संजय मोने व सुकन्या कुलकर्णी यांच्याशी मिलिंद कुलकर्णी संवाद साधला.

पुण्यात बनविण्यात आला ६१० किलोचा मोतीचूर लाडू – सविस्तर बातमी 

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बालपणातील अनेक किस्से, घरातून लाभलेले संस्कार, संसारातील अनेक कडू-गोड आठवणी, कलाकार म्हणून झालेली जडण-घडण, सहकलारांशी असलेले नाते, नाटकांच्या प्रयोगादरम्यान घडलेले गंमतशीर प्रसंग, सहकलाकार म्हणून एकत्र काम करत असताना सहवासातून निर्माण झालेले ऋणानुबंध अशा विविध रंगतदार आठवणी आणि किश्शांमधून उलगडत गेलेले प्रसंग रसिकांनी मनमुराद दाद देत अनुभवले. डॉ. गिरीश ओक यांनी ‘बादल बिजली चंदन पानी ऐसा अपना प्यार’ हे गीत आणि ‘पाहिली मुंबई’ हा पोवाडा तयारीने सादर केला तर संजय मोने यांनी डॉ. गिरीश ओक यांच्या पुस्तकाला स्वत: लिहिलेल्या प्रस्तावनेचे प्रभावीपणे वाचन केले. रसिकांनी यास भरभरून दाद दिली.

तीन तास रंगलेल्या गप्पांच्या मैफलीत याच कलाकरांनी फर्माईश केलेली ‘गगन सदन तेजोमय’, ‘मर्म बंधातली ठेव ही’, ‘पाहिले न मी तुला’, ‘प्रथम तुज पाहता’, ‘का कळेना’, ‘आईये मेहेरबा’, ‘आपकी आँखे मे कुछ’, ‘कुछ न कहो’, ‘तेरे मेरे सपने’ आदी मराठी-हिंदी चित्रपटगीते बहारदारपणे सादर करून गायकांनी मैफलीत रंगत भरत कार्यक्रमाची सांगता ‘अभी ना जाओ छोड कर के दिल अभी भरा नही’ या गाण्याने केली. तेव्हा कलाकारांसह रसिकांनीही ‘‘खरच अजून मन भरले नाही, खूप बोलायचे, सांगायचे आणि ऐकायचे राहिले’’ असे म्हणत ही मैफल अशीच सुरू राहावी अशी इच्छा व्यक्त केली. पुण्यातील नामवंत गायक चैत्राली अभ्यंकर, संजीव मेहेंदळे, अक्षय घाणेकर यांनी संसारातील गोडी वाढविणाऱ्या अनेक सुमधुर गीतांचे बहारदार सादरीकरण केले.

गायकांना ओंकार पाटणकर, राजेंद्र हसबनीस, संजय खाडे यांनी समर्पक साथसंगत करून कार्यक्रमाची गोडी वाढविली. सुप्रसिद्ध की-बोर्ड वादक विवेक परांजपे यांचे वाद्यवृंदाचे नेटके संयोजन केले. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची निर्मिती सुनील महाजन यांची होती तर निकिता मोघे सूत्रधार होत्या. संयोजन केतकी महाजन-बोरकर यांचे होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×