दिवाळी पाडवा आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या वाढदिवसाचे होते निमित्त
marathinews24.com
पुणे – दिवाळी पाडवा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, रायकर फार्म, बाणेरमध्ये तब्बल ६१० किलो वजनाचा मोतीचूर लाडू तयार करून अनोखा विश्वविक्रम रचण्यात आला आहे.
शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची दिवाळी; या अधिकाऱ्यांना पदोन्नती – सविस्तर बातमी
लाडू तयार करण्यासाठी १५० किलो बेसन, ३०० किलो साखर, आणि १५० किलो तूप यांचा वापर करण्यात आला. हा लाडू “सर्वात मोठा वाढदिवसाचा लाडू” म्हणून विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अधिकृतपणे नोंदवण्यात आला आहे. लाडूचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या प्रसंगी विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे चेअरमन अभिनेत्री मिस इंडिया डॉ. ईशा अगरवाल यांनी या विश्वविक्रमाची घोषणा केली.
विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र
१८४ विश्वविक्रम करणारे पहिले भारतीय बी.के. डॉ. दीपक हरके, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, बाणेर सेवाकेंद्राच्या संचालिका बी. के. डॉ. त्रिवेणी, आणि समृद्धी केटरर्सचे संचालक जालिंदर वाळके पाटील यांना चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. हा उपक्रम अमित शाह यांच्या जनसेवेच्या प्रेरणेतून, समाजात प्रेम, ऐक्य आणि स्नेहाचा संदेश देणारा ठरला. सदर 610 किलो लाडूचे वितरण चार अनाथ आश्रमात वितरीत करण्यात आला.




















