Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

कुख्यात गुंड निलेश घायवळला मिळणार इंटरपोलची नोटीस

कुख्यात गुंड निलेश घायवळला मिळणार इंटरपोलची नोटीस

ब्ल्यु कार्नर नोटीस काढण्या संदर्भात पुणे पोलिसांच्या हालचाली

marathinews24.com

पुणे – शहरातील कुख्यात फरार गुंड निलेश घायवळ याला थेट आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना (इंटरपोल) मार्फत ’ब्ल्यू कॉर्नर नोटीस’ बजावण्याची भारत सरकारच्या धरतीवर पाठपुरवा केला जात आहे. याबाबत सरकारशी समन्वय साधून घायवळला ब्लु कार्नर नोटीस बजाविण्याच्या प्रक्रियेसाठी पुणे पोलिसांकडून पाठपुरवा करण्यात येत असल्याची माहिती पोलिस उपायुक्त निखील पिंगळे यांनी दिली आहे. घायवळ सातत्याने पोलिसांना गुंगारा देत आहे. त्याचा ठावठिकाणा निश्चित होत नसल्यामुळे, अखेरीस तपास यंत्रणांनी इंटरपोलकडे आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी धाव घेतली आहे.

कात्रज भागात तरुणाच्या खूनाचा उलगडा; आरोपी गजाआड – सविस्तर बातमी 

इंटरपोलने ही महत्त्वपूर्ण ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी करावी असा पाठपुरवा केला जात आहे. दरम्यान, ’ब्ल्यू कॉर्नर नोटीस’ म्हणजे, इंटरपोलकडून जारी केल्या जाणार्‍या ७ रंगांच्या नोटिसांपैकी आहे. ’ब्ल्यू कॉर्नर नोटीस’ ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ही नोटीस थेट अटक करण्याचा आदेश देत नाही. परंतु त्याचा उद्देश हा आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी अत्यंत निर्णायक ठरतो. एखाद्या फरार व्यक्तीची ओळख, तिचा सध्याचा ठावठिकाणा आणि ती कोणत्या गुन्हेगारी कारवायांमध्ये गुंतलेली आहे, याबद्दलची माहिती गोळा करणे, हे या नोटीसचे मुख्य उद्दिष्ट असते.

नोटीसमुळे इंटरपोलचे सदस्य असलेले तब्बल १९६ देश तात्काळ सक्रिय होतात. याचा अर्थ असा की, गुंड निलेश घायवळ जगात कोणत्याही देशात लपून बसलेला असला तरी, तो एखाद्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर किंवा कोणत्याही हॉटेलमध्ये दिसल्यास, त्या देशातील स्थानिक पोलीस यंत्रणांना त्वरित त्याची माहिती इंटरपोल आणि भारताला कळवणे बंधनकारक ठरते. संबंधित नोटीस म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या गुन्हेगाराला ’वॉचलिस्ट’वर टाकणे असे म्हटले जाते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×