Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

कुख्यात नीलेश घायवळ फरार घोषित

कुख्यात नीलेश घायवळ फरार घोषित

न्यायालयाने केली घोषणा

marathinews24.com

पुणे – शहरातील कोथरूड गोळीबार प्रकरणात बनावट कागदपत्रांच्या आधारे पारपत्र मिळवत लंडन गाठणार्‍या कुख्यात गुंड नीलेश घायवळ याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. पी. जैन-देसर्डा यांनी फरार घोषित केले आहे. त्यामुळे घायवळच्या अडचणीत वाढ झाली आहे. तरूणावर किरकोळ वादातून गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर घायवळने परदेशात पलायन केले आहे.

जादा भाडे देण्याच्या आमिषाने मोटारींची लुट – सविस्तर बातमी 

गुंड नीलेश घायवळ याने ९० दिवसांचा व्हिसा मिळवत लंडन गाठले. ब्रिटन उच्चायुक्तालयाशी पत्रव्यवहार झाल्यानंतर घायवळ लंडनमध्ये असल्याचे समोर आले होते. घायवळ व्हिजिटर व्हिसावर लंडमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती युके हाय कमिशनने पुणे पोलिसांना दिली. दरम्यान, घायवळला फरार घोषित करण्यात यावे, अशी मागणी करणारा अर्ज पुणे पोलिसांनी न्यायालयात दाखल केला होता.

न्यायालयाने पोलिसांचा अर्ज मंजूर करत घायवळ याला फरार घोषित केले आहे. त्यामुळे त्याच्या प्रत्यर्पणाच्या प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला असून, कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करून त्याला लवकरच देशात परत आणण्यात येईल. घायवळविरुद्ध बनावट कागदपत्रांच्या आधारे पारपत्र काढून प्रशासनाची फसवणूक करण्यासह इतर गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. या प्रकरणांमध्ये न्यायालयाने त्याला फरारी घोषित केले आहे. या निर्णयामुळे त्याची मालमत्ता जप्त करणे शक्य होणार आहे, असे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×