महापालिका निवडणुकीत अडथळा आणला; तिघांविरुद्ध गुन्हा

महापालिका निवडणुकीत अडथळा आणला; तिघांविरुद्ध गुन्हा

मतदान केंद्राकडे जाणारा रस्ता अडवून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा

marathinews24.com

पुणे – महापालिका निवडणुकीत मतदान केंद्राकडे जाणारा रस्ता अडवून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांविरुद्ध वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई बालाजी काटे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सचिन देवराम उरीट, अभिराज उरीट, पृथ्वीराज उरीट (तिघे रा. वारजे माळवाडी) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार नीला देसाई यांच्या निधनाने स्त्री शक्तीची मोठी हानी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भावपूर्ण श्रद्धांजली – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिका निवडणुकीतील मतदान गुरुवारी (१५ जानेवारी) पार पडले. वारजे माळवाडीतील पाॅप्युलरनगर परिसरातील पं. जवाहरलाल नेहरु प्राथमिक विद्यामंदिरात मतदान केंद्र होते. आरोपी उरीट यांनी मतदान केंद्राकडे जाणारा रस्ता अडविला. आम्ही गावकरी आहोत, असे सांगून त्यांनी मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण केला. मतदान केंद्र बंद पाडू, अशी धमकी देऊन आरोपींनी मतदान प्रक्रियेत अडथळा आणून दहशत माजविली. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी उरीट यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर रायगौंडा तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×