Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

वैमनस्यातून मार्केटयार्ड परिसरात एकावर पिस्तुलातून गोळीबार

वैमनस्यातून मार्केटयार्ड परिसरात एकावर पिस्तुलातून गोळीबार

गुलटेकडीतील वर्चस्वातून गोळीबार झाल्याचे उघड

marathinews24.com

पुणे – वैमनस्यातून एकावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना मार्केट यार्ड भागात शुक्रवारी रात्री घडली. गोळीबार एक तरुण जखमी झाला आहे. गुलटेकडीतील मीनाताई ठाकरे वसाहत परिसरातील दोन टोळ्यांमधील वर्चस्वातून गाेळीबार झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या प्रकरणी सराइतांसह सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठवड्यापूर्वी गुलटेकडीत अल्पवयीनांनी पिस्तुलातून गोळीबार करुन दहशत माजविल्याची घटना घडली होती.

मैत्रिणीकडे पाहून गाणे गायले; गैरसमजातून तरुणाचा खुनाचा प्रयत्न – सविस्तर बातमी 

मोझेस शेकापुरे उर्फ मोझ्या (वय २२, रा. मीनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बालाजी उमाप, राम उमाप यांच्यासह सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलटेकडीतील मीनाताई ठाकरे वसाहतीत उमाप टोळी आणि अमित शेकापुरे यांच्यात वर्चस्वातून वाद आहे. शुक्रवारी दुपारी बालाजी उमाप आणि अमित शेकापुरे यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर शुक्रवारी (६ मार्च) रात्री साडेअकराच्या सुमारास अमित शेकापुरे याचा भाऊ मो्झेस आणि त्याचा मित्र हे दुचाकीवरुन मार्केट यार्डातील वखार महामंडळाकडून गंगाधाम चौकाकडे निघाले होते.

त्यावेळी त्यांच्या मागावर असलेले आरोपी बालाजी उमाप, राम उमाप आणि चार ते पाच साथीदार दुचाकीवरुन आले. हल्लेखोरांनी शेकापुरे आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्राला अडवले. उमाप याने पिस्तुलातून गोळीबार केला. गोळी शेकापूरे याच्या पाठीत शिरल्याने तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या शेकापुरेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्लेखाेरांना शेकापुरे याच्याबरोबर असलेल्या मित्रावर गोळीबार करायचा होता. मात्र, गोळीबार शेकापुरे जखमी झाल्याची माहिती तपासात मिळाली आहे. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×