Breking News
राज्यातील प्रत्येक क्रीडांगणांवर स्वच्छतागृहे, चेंजिंग रूम, प्रकाशयोजनांसह सीसीटीव्ही सुविधा अनिवार्य करण्याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे निर्देशपुणे जिल्ह्यात गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दापाश, आरोपीला अटकएल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामात योग्य नियोजन करा-तालुका कृषी अधिकारीपार्टटाईम नोकरीचे आमिष पडले ६ लाखांनापुणे पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्याफुलेप्रेमी कवीच्या कुटुंबाला तीन लाखांची आर्थिक मदतपुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीड

वाल्मिक कराडची सीआयडी कार्यालयात शरणागतीची वर्षपूर्ती

दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण

marathinews24.com

पुणे – राज्यभरात गाजलेल्या बीडमधील सरपंच हत्याकांडाप्रकरणी संशयित आरोपी वाल्मिक कराड याने ३१ डिसेंबर २०२४ दुपारी सव्वा बाराच्या सुमारास गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) मुख्यालयात शरणागती पत्करली. त्या घटनेला आज वर्षपूर्ती झाली आहे. खासगी गाडीतून दोघांसमवेत प्रवास करीत त्याने पोलिसांसमोर हजेरी लावली. तत्पुर्वी त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करून याप्रकरणाशी आपला काहीही संबंध नसून, राजकीय द्वेषापोटी विनाकारण गोवले जात असल्याचा आरोप केला. तर राजकीय वरदहस्तामुळे कराड हा पोलीस, तपास यंत्रणांना अक्षरशःगुंगारा देत होता. अखेर नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर रोष वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने पुणे गाठून शरणागती पत्करली. दरम्यान, या गुन्ह्यात त्याच्यासह इतर आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र नुकतेच दाखल करण्यात आले आहे.

अनुज्ञप्ती चाचणीसाठी वाढविण्यात आला अपॉइंटमेंट कोटा – सविस्तर बातमी

पवनचक्की कंपनी व्यावसायिकांना कोट्यावधी रूपयांची खंडणी प्रकरणात विद्यमान अन्नधान्य पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे खास विश्वासू असलेल्या वाल्मिक कराड याच्याविरूद्ध बीड पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांनी पवनचक्की प्रकरणात मध्यस्थी केली होती. याच रागातून टोळक्याने देशमुख यांचे अपहरण करून बेदम मारहाण करीत त्यांचा खून केला होता. हल्लेखोरांनी अतिशय निर्दयीपणे देशमुखांना मारहाण झाल्यामुळे संपुर्ण राज्यभरात संतापाची लाट निर्माण झाली. त्यामुळे बीडसह राज्यातील ठिकठिकाणी बंद पुकारले होते. हत्याप्रकरणात बीड पोलिसांनी तिघांना अटक केली होती. दरम्यान, खूनप्रकरणात वाल्मिक कराड याच्याच सांगण्यानुसार संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा आरोप देशमुखांच्या कुटूंबियांनी केला. त्यानुसार कराडची पोलिसांकडून चौकशी होणार होती. मात्र, त्यापुर्वीच त्याने बीड सोडून देवदर्शनाला सुरूवात केली. वाल्मिक कराडचे या प्रकरणात नाव आल्यानंतर त्याचा शोध बीड पोलिस घेत होते. मात्र, त्याने बीड पोलिसांसमोर हजर न होता पुण्यात सीआयडी कार्यालयात शरणागती का पत्करली असे प्रश्न उपस्थित झाले होते.

तर शिक्षा भोगायला तयार – वाल्मिक कराड

केज पोलीस स्टेशनमध्ये माझ्या विरोधात खोट्या खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे. मला अटकपूर्व अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे येथे सरेंडर होत आहे. संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय रोषापोटी माझं नाव त्यांच्याशी जोडले जात आहे. पोलीस तपासाचे निष्कर्ष येतील. त्यात मी जर दोषी दिसलो तर मला शिक्षा द्यावी, ती मी भोगायला तयार आहे असे वाल्मीक कराड याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये नमूद केले होते.

कराड याने शरणागती पत्करल्याचा घटनाक्रम

वाल्मिक कराड सीआयडी कार्यालयात शरणागती पत्करणार असल्याची चर्चा मागील दोन दिवसांपासून होती. त्यानुसार सोमवारी सकाळी पुण्यातील सी आय डी कार्यालयाबाहेर कराडचे कार्यकर्ते दाखल झाले होते.

सकाळी ९ वाजता-

सीआयडी कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

सकाळी १० वाजता-

उपायुक्त संदीप गिल्ल, उपायुक्त निखिल पिंगळे यांनी सुरक्षेचा आढावा घेतला.

सकाळी ११ वाजता-

सीआयडी कार्यालयात वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बैठका

दुपारी १२ वाजता

शरणागती पत्करण्याआधी वाल्मिक कराडने स्वतःचा व्हिडिटो शेअर केला.

दुपारी १२.१० वाजता

एमएच २३ बीजी २२३१ स्कॉर्पिओ गाडीतून चेहरा लपवत वाल्मीक कराड सीआयडी कार्यालयात दाखल

दुपारी १ वाजता

सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत बुर्‍हाडे यांच्याकडून कराडची चौकशी सुरू

केज पोलिस ठाण्यात दाखल खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराड मंगळवारी सकाळी साडेबाराच्या सुमारास स्वत:हून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) मुख्यालयात हजर झाला. सीआयडीच्या पुणे विभागाने त्याला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी केली आहे. गुन्ह्याचा तपास सीआयडीच्या बीड विभागाचे उपअधिक्षक अनिल गुजर करत आहे. सीआयडीचे पथक कराडला घेऊन बीडला रवाना झाले आहे, अशी माहिती राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे तत्कालीन उपमहानिरीक्षक सारंग आव्हाड यांनी दिली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×