Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

ऑनलाइन खेळणी खरेदी महागात

पोलिसांची केली बतावणी, जेष्ठाला ४८ लाखांचा ऑनलाईन गंडा

सायबर चोरट्यांकडून महिलेची फसवणूक

marathinews24.com

पुणे – लहान मुलांच्या खेळण्यातील मोटार (टाॅय कार) ऑनलाइन खरेदी करणाऱ्या महिलेची सायबर चोरट्यांनी तीन लाख ७१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कृष्णा आंदेकरच्या खुनाचा कट उघड – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रादार महिला शिवाजीनगर भागात राहायला आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी समाज माध्यमात लहान मुलांच्या खेळण्याची जाहिरात पाहिली होती. स्वस्तात खेळण्यांची विक्री करण्यात येणार असल्याचे आमिष चोरट्यंनी महिलेला दाखविले होते. त्यानंतर महिलेने खेळण्यातील एक मोटार पसंत केली. मोटारीच्या किंमतीबाबत तिने जाहिरातीत दिलेल्या क्रमांकावर विचारणा केली. तेव्हा चोरट्यांनी ऑनलाइन पद्धतीने महिलेले पैसे पाठविण्यास सांगितले. महिलेने चोरट्यांच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठविले. त्यानंतर चोरट्यांनी वेगवेगळी कारणे सांगून महिलेकडून तीन लाख ७१ हजार रुपये उकळले.

चोरट्यांनी महिलेला मोटार घरपोहोच पाठविली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याननंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांकडून या प्रकरणाचा तांत्रिक तपास करण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×