जागतिक दर्जाचे सहावे हॉर्टीकल्चर प्रदर्शन पाहण्याची संधी

आंतरराष्ट्रीय फुलोत्पादन व बागायती प्रदर्शनाचे 13 ते 16 नोव्हेंबरला आयोजन

marathinews24.com

पुणे – भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय फुलोत्पादन, बागायती हॉर्टिकल्चर, फ्लोरीकल्चर, आर्बोरीकल्चर, ॲग्रीप्रेन्योरशिप आणि प्रगत प्रक्रिया तंत्रज्ञानावर आधारित प्रदर्शन गुरुवारी 13 ते 16 नोव्हेंबर दरम्यान पार पडणार आहे. हे भव्य प्रदर्शन नवीन कृषी महाविद्यालय मैदान, सिंचननगर पुणे येथे 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.00 वा. केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन पार पडणार आहे. त्याच बरोबर आमदार हेमंत रासने, सचिन इटकर, गणेश खांडगे, सोनिया कोंझोटी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत वसंत रासने, दीपक चॅटर्जी, विजय रासने, अरविंद चव्हाण, निशिकांत धुमाळ, महिपालसिंह राणा यांनी दिली.

‘बहुरंगी, बहुढंगी भाई’मधून पुलंच्या चतुरस्र पैलूंचा मागोवा – सविस्तर बातमी

जगभरातील 12 देश तसेच भारतातील 20 राज्यातून लोक उपस्थित राहणार आहेत. या हॉर्टीकल्चर प्रदर्शनात विविध प्रकारच्या वनस्पती, फुलांचे नवे प्रकार, गार्डनिंगसाठी अत्याधुनिक साधनसामग्री आणि तंत्रज्ञान पाहायला मिळणार आहे. देश-विदेशातील शेतकरी, बागायती तज्ञ, व्यावसायिक तसेच संशोधक या प्रदर्शनात सहभागी होणार असून, शेतकरी व उद्योजकांना मार्गदर्शन सत्रेही आयोजित केली जाणार आहेत.

या प्रदर्शनातून बागायती क्षेत्रातील रोजगार व व्यवसायाच्या नव्या संधींचे द्वार उघडणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. प्रदर्शन दरम्यान हॉर्टीकल्चर क्षेत्रातील नवीन ट्रेंड्स, तंत्रज्ञान आणि बाजारपेठेतील संधी यांवर विशेष चर्चा सत्रे होणार आहेत. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत वसू इव्हेंट इंटरनॅशनलचे वसंत रासने, दीपक चॅटर्जी, विजय रासने, अरविंद चव्हाण, निशिकांत धुमाळ आणि महिपाल राणा हे मान्यवर उपस्थित होते.
हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून, दररोज सकाळी 10.00 ते संध्याकाळी 7.00 वाजेपर्यंत नागरिकांना भेट देता येणार आहे. आयोजकांनी पुणेकरांना या अद्वितीय प्रदर्शनाला आवर्जून भेट देण्याचे आवाहन केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×