Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

महिलांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

१७ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता रोजगार मेळाव्याचे आयोजन

marathinews24.com

पुणे – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत एशियन कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स पुणे यांच्या सयुक्त विद्यमाने एशियन कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स सर्व्ह नं. २८/१५/१६, नऱ्हे धायरी रोड, पारी कंपनी चौक, धायरी येथे १७ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पुण्यात पोपट-मांजराचा वाद थेट ठाण्यात पोहचला – सविस्तर बातमी 

या मेळाव्यामध्ये जिल्हयातील औद्योगिक परिसरातील २४ नामांकित उद्योजकांनी त्यांच्या सहभाग दर्शविलेला असून, त्यांच्याकडून १९०० पेक्षा जास्त रिक्तपदे भरण्यात येणार आहेत. ही सर्व रिक्तपदे किमान १० वी, १२ वी, पदवीधर, डिप्लोमा अशा विविध पात्रताधारक उमेदवारांसाठी असून पुणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरी इच्छुक व बेरोजगार उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

इच्छुक उमेदवारांनी रिक्त पदांबाबत अधिक माहिती करुन घेण्यासोबतच अर्ज करण्याकरिता www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. खाजगी क्षेत्रातील विविध रिक्त पदांच्या प्रत्यक्ष मुलाखतीसाठी अधिकाधिक नोकरीइच्छुक रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून, आपला सहभाग नोंदवावा व या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा.

नोकरी इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस येताना सोबत आपल्या सर्व शैक्षणिक कागदपत्राच्या छायांकित प्रती, आवश्यकतेनुसार अर्जाच्या प्रती सोबत आणाव्यात. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे, ४८१ रास्ता पेठ, सरदार मुदलीयार रोड, पुणे-४११०११ येथे प्रत्यक्ष अथवा ०२०-२६१३३६०६ या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×