Breking News
चेन स्नॅचिंग करणारे चोरटे २४ तासांत जेरबंदसहकार क्षेत्रासाठी सकारात्मक संधी निर्माण करणारा अर्थसंकल्प-विद्याधर अनास्कररुजवू मराठी, फुलवू मराठी” संकल्पनेतून मराठी भाषा गौरव दिन उत्साहातमहिलांना वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या पापा शेखसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखलरुग्ण हक्क परिषदेचा शिवसन्मान पुरस्कार प्रेरणादायी – भानुप्रताप बर्गे यांचे मतउपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची घेतली सदिच्छा भेटराज्याच्या अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्याला मोठा निधीभांडगावच्या भक्तामर कलश तीर्थावर भव्य पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवअजितदादांचा घातपातच, व्हीएसआरला व्हीआयपी ट्रीटमेंट- आमदार रोहित पवारपुण्यात बालेवाडीतील बारमध्ये तरुण-तरुणीचा गोंधळ

स्वरमयी बैठकीत पंडित संजय गरुड यांचे सुश्राव्य गायन

स्वरमयी बैठकीत पंडित संजय गरुड यांचे सुश्राव्य गायन

किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक पंडित डॉ. संजय गरुड यांची मैफल

marathinews24.com

पुणे – सुश्राव्य आणि सहज फिरत असलेला आवाज, दमदार ताना, बहारदार सादरीकरण यातून रंगली किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक पंडित डॉ. संजय गरुड यांची मैफल. निमित्त होते डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशन संचलित स्वरमयी गुरुकुलतर्फे आयोजित मासिक स्वरमयी बैठकीचे. मैफल दि. २४ ऑगस्टला स्वरमयी गुरुकुल सभागृह, संभाजी उद्यानासमोर येथे झाली.

संगीत सौभद्र.. पाच तास.. ५६ नाट्यपदे.. टाळ्या अन्‌ प्रतिसाद – सविस्तर बातमी 

पंडित डॉ. संजय गरुड यांनी आपल्या मैफलीची सुरुवात मिया की तोडी रागातील ‌‘बैय्या भर न देत गगरिया‌’ या पारंपरिक बंदिशीने केली. याला जोडून द्रुत तालातील ‌‘लंगर कांकरिया जी ना मारो‌’ ही सुप्रसिद्ध रचना सादर केली. या नंतर खमाजमधील ‌‘अब कैसे घर जाऊ कन्हैया‌’ ही रचना ऐकविताना पंडित गरुड यांनी रसिकांसमोर कृष्णलिलेचे अवर्णनिय रूप साकार केले. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज रचित ‌‘आता कोठे धावे मन‌’ ही भक्तीरचना सादर करून रसिकांना भक्तीरसाचा अद्भुत आनंद दिला. ‌‘बाजे रे मुरलिया बाजे‌’ हे सुप्रसिद्ध कृष्णभजन ऐकवून पंडित गरुड यांनी कृष्ण आणि त्याच्या वेणूच्या अद्वैताचे रूप दर्शविले. मैफलीची सांगता ‌‘जो भजे हरि को सदा‌’ या लोकप्रिय भैरवीने केली.

स्वरसावलीच्या वास्तूत सादर झालेली ही मैफल रसिकांना अवर्णनीय आनंद देऊन गेली. रोहन पंढरपूरकर (तबला), माऊली फाटक (पखवाज), तुषार केळकर (संवादिनी), प्रसाद कुलकर्णी, गणेश ढाकोळे (सहगायन) यांनी साथसंगत करत मैफलीत बहार आणली. डॉ. अश्विनी वळसंगकर यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. डॉ. संजय गरुड यांच्या गुरुमाता शीला देशपांडे यांनी कलाकारांना आशीर्वादरूपी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे निवेदन वर्षा किराड यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×