Breking News
Maharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

गटई कामगारांना १०० टक्के अनुदानावर पत्र्याचे स्टॉल

केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रात २९ जून ते ६ जुलै २०२६ दरम्यान 'सहकार सप्ताह'चे आयोजन

अर्जाची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६

marathinews24.com

पुणे – सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील चर्मकार व्यवसाय करणाऱ्या गटई कामगारांसाठी “पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना” राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत गटई काम करताना ऊन व पावसापासून संरक्षण मिळावे यासाठी १०० टक्के अनुदान तत्वावर पत्र्याचे स्टॉल तसेच कमाल ५ हजार रुपये इतके अनुदान डीबीटीद्वारे देण्यात येणार आहे.

साथी पोर्टल: बियाण्यांच्या पारदर्शकता, गुणवत्ता व विश्वासार्हतेकडे डिजिटल पाऊल – सविस्तर बातमी

या योजनेसाठी अर्जदार अनुसूचित जाती अथवा नवबौद्ध प्रवर्गातील असून त्यांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी नसावे. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शहरी भागासाठी १ लाख रुपये व ग्रामीण भागासाठी ८० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे. अर्जदाराने स्टॉलसाठी मागितलेली जागा ग्रामपंचायत, नगरपालिका, छावणी बोर्ड किंवा महानगरपालिकेकडून अधिकृतरित्या भाडे, करार, खरेदी अथवा मोफत ताब्यात दिलेली असावी किंवा ती स्वमालकीची असावी. संबंधित जागेचा अर्जदाराच्या नावाचा चालू ७/१२ उताराही आवश्यक राहणार आहे.

अर्जासोबत सक्षम प्राधिकाऱ्याचा जातीचा दाखला जोडणे आवश्यक आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, सर्वे नं. १०४/१०५, विश्रांतवाडी पोलिस स्टेशनसमोर, येरवडा, पुणे – ४११००६ येथे अर्ज सादर करावेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ असून अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२०-२९७०६६११ वर संपर्क साधावा.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×