Breking News
Maharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

Parvati Crime : पोलिसांकडे तक्रार देणाऱ्या तरुणाचा खुनाचा प्रयत्न

Pune Crime News

पर्वती दर्शन परिसरातील घटनेत आरोपीला अटक

marathinews24.com

पुणे – Parvati Crime : मारहाणीची तक्रार पोलिसांकडे देण्यासाठी निघालेल्या तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना पर्वती दर्शन परिसरात घडली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. वैभव गणेश वेदपाठक (वय १८, रा. गल्ली क्रमांक ३७, जनता वसाहत, पर्वती पायथा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. नीलेश चंद्रकांत धुमक (वय ३०, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा ) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

धर्मांतरासाठी तृतीय पंथीयावर दबाब; धमकावून साडेसहा लाखांची लूट – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेदपाठक आणि धुमक हे शेजारी राहायला आहेत. शुक्रवारी (९ ऑक्टोबर) दुपारी अडीचच्या सुमारास नीलेस घरी जेवण करत होता. त्या वेळी त्याचा वडिलांशी वाद झाला. आरोपी वैभव तेथे आला. तुमच्या भांडणामुळे त्रास होतो, असे सांगितले. वैभवने नीलेशला शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यानंतर नीलेश पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी निघाला. पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी निघालेल्या नीलेशला आरोपीने अडवले. Parvati Crime त्याच्यावर कोयत्याने वार केला. या घटनेत नीलेश गंभीर जखमी झाला. आरोपी तेथून पसार झाला. जखमी अवस्थेतील नीलेश पोलीस चौकीत गेला. त्याने याबाबतची तक्रार दिली. पसार झालेला आरोपी वेैभव याला पोलिसांनी अटक केली. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश खिलारी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×