Breking News
शोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडापुण्यात खासगी विद्यार्थी वसतिगृहातून लॅपटाॅप चोरीलामाॅडेल काॅलनीत घरफोडी; ९ लाखांचे दागिने चोरीला

भोसरी रुग्णालयातून रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठविले जातात

भोसरी येथील नवीन रूग्णालयात आठ

सचिन काळभोर यांची आयुक्तांकडे तक्रार

marathinews24.com

पिंपरी  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भोसरी येथील नवीन रूग्णालयात आठ बेडचे अतिदक्षता विभाग आहे. मात्र, अतिदक्षता विभागात गंभीर व अस्वस्थ रूग्णांना दाखल करून घेतले जात नाही. त्या रूग्णांना खासगी रूग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे महत्वाचा वेळ वाया जातो. त्यात रूग्ण दगावण्याचा धोका निर्माण होतो. तसेच, रूग्णालयाचा शोध घेण्यासाठी सर्वसामान्य रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होते, अशी तक्रार भाजप शहर सरचिटणीस सचिन काळभोर यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

पीएमआरडीएच्या गृहप्रकल्पात सोलरद्वारे विजेची ३० टक्के बचत – सविस्तर बातमी 

वैदयकीय सेवेचे विकेंद्रीकरण करताना पिंपरी-चिंचवड महापालिकेने भोसरी येथे नवीन सुसज्ज रूग्णालय उभारले आहे. त्यासाठी महापालिकेने कोट्यवधी रूपयांचा खर्च केला आहे.या रुग्णालयात अतिदक्षता विभागात महापालिकेने लाख ते दीड लाख रूपये वेतनावर अनुभवी फिजिशियन तज्ज्ञ डॉक्टर नेमले आहेत. महापालिकेच्या वायसीएम बरोबरच व इतर रूग्णालयांत अतिदक्षता विभाग नेहमी फुल्ल असतात. तेथे रूग्ण दाखल करून घेण्यासाठी नेहमी वेटींग असते. मात्र, नवीन भोसरी रूग्णालयात अतिदक्षता विभागात रूग्णांना दाखल करून न घेता, त्यांना खासगी रूग्णालयत किंवा इतर रूग्णालयात दाखल करण्याची शिफारस केली जात आहे.

त्यामुळे येथील डॉक्टरांचा बाहेरील खाजगी रुग्णालयाशी आर्थिक हितसंबंध असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी अन्यथा नवीन भोसरी रूग्णालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा काळभोर यांनी दिला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×