Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पाळीव श्वानाकडून चावा; श्वान मालकांविरुद्ध गुन्हे

शिवाजीनगर, खडकीतील घटना

marathinews24.com

पुणे – पाळीव श्वानाने वेगवेगळ्या घटनेत दोघांचा चावा घेतल्याची घटना घडली. शिवाजीनगर गावठाण, तसेच खडकीतील रेंजहिल्स भागात घडली. पाळीव श्वान मोकळे साेडून दुखापतीस जबाबदार असल्याप्रकरणी पोलिसांनी दोन श्वान मालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले.

प्रवासी महिलेकडील ६ लाखांचे दागिने चोरी – सविस्तर बातमी

शिवाजीनगर गावठाण परिसरातील समग्र युवक क्रांती मंडळाजवळ एका तरुणाचा ‘पीटबुल’ जातीच्या श्वानाने चावा घेतल्याची घटना २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली. श्वानाने तरुणाच्या पोटरीचा चावा घेतल्याने त्याला जखम झाली. याबाबत एका तरुणाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, एका श्वान मालक तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘पीटबुल’ जातीचे श्वान आक्रमक आहे. श्वान मालकाने त्याला साखळी न बांधता रस्त्यावर सोडले होते, असे तरुणाने फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक जगताप तपास करत आहेत.

खडकीतील रेंजहिल्स भागात किरकोळ वादातून एकाने त्याचे पाळीव श्वान अंगावर सोडले. पाळीव श्वानाने चावा घेतल्याने एक जण जखमी झाला. याप्रकरणी श्वान मालकाविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तरुणाने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी खडकीतील रेंजहिल्स भागात राहायला आहे. तो त्याच्या पाळीव श्वानाला घेऊन २६ ऑक्टोबर रोजी सकाळी थांबला होता. त्यावेळी आरोपीने तक्रारदार तरुणाच्या गाडीच्या दिशेने भिरकावला. तक्रारदार इमारतीतून खाली उतरले. ‘दगड का भिरकावला?’ अशी विचारणा केली. तेव्हा आरोपीने त्याचे पाळीव श्वान तक्रारदार तरुणाच्या अंगावर सोडले. श्वानाने चावा घेतल्याने तरुण जखमी झाला. पोलीस उपनिरीक्षक शेख तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×