हडपसर भागातील घटना
marathinews24.com
पुणे – परगावी निघालेल्या प्रवासी महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी ६ लाख २९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना हडपसर भागात घडली. याबाबत एका महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मूळच्या सोलापूरच्या आहेत. दिवाळीनिमित्त त्या पुण्यात नातेवाईकांकडे आल्या होत्या. पुणे-सोलापूर रस्त्यावरील रवीदर्शन थांब्यावर रविवारी (२६ ऑक्टोबर) सकाळी नऊच्या सुमारास त्या सोलापूरकडे जाणाऱ्या बसची वाट पाहत थांबल्या होत्या. बसमध्ये प्रवेश करताना चोरट्यांनी त्यांच्या पिशवीतून सोन्याचे दागिने लांबविले. गर्दीत दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक मुलाणी तपास करत आहेत.
कात्रज पीएमपी स्थानकात दागिने चोरीला
कात्रज पीएमपी स्थानकात प्रवासी महिलेच्या गळ्यातील ७५ हजारांची सोनसाखळी चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला नगर रस्त्यावरील चंदननगर भागात राहायला आहेत. २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्या बसमध्ये प्रवेश करत होत्या. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी लांबविली.



















