Breking News
Dagdusheth Ganpati Temple Pune : श्रीमंत दगडूशेठ बाप्पाला ११०० नारळांचा महानैवेद्यPune ACB Bribery Case : फेरफार नोंदींसाठी २० हजारांची लाच मागितलीPune Cat Theft Case : पर्शियन मांजरीची चोरी करून विक्री; ५ जणांवर गुन्हा दाखलPune Online Fraud News : ‘टॉनिक’च्या नावाने गुगलवर बनावट वेबसाइटPune Theft News : मद्य विक्री दुकानाचे कुलूप तोडून रोकड लंपासKharadi Crime News : दारुच्या नशेत पोलिसांना धक्काबुक्की; दोघांविरुद्ध गुन्हा दाखलKasba Peth Crime News : पुण्यात कसबा पेठ, बुधवार पेठ, गुलटेकडीत पादचाऱ्यांचे मोबाइल हिसकावलेPune Gold Chain Snatching : तरुणीची तीन लाखांची सोनसाखळी हिसकावलीMukhyamantri Matsya Sampada Yojana : मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजना व मासेमारी परवाना सेवा आता पूर्णपणे ऑनलाईनShare Trading Scam Pune : शेअर ट्रेडिंगमधून परताव्याचे आमिष; २५ लाखांची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक

Pune Investment Fraud

स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषााने सायबर चोरट्यांनी एकाची १४ लाख १७ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे महर्षीनगर भागात राहायला आहेत.

मार्केटयार्ड भागातील घरातून दागिन्यांसह लॅपटाॅप चोरीं – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी तक्रारदाराच्या मोबाइल क्रमांकावर सप्टेंबर महिन्यात संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. तक्रारदाराने चोरट्यांच्या खात्यावर १४ लाख १७ हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम तपास करत आहेत.

गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाची ३७ लाखांची फसवणूक

पुणे – गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाची ३७ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. व्यावसायिकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यंनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक हे पिंपरीत राहायला आहेत. आरोपी सिंहगड रस्ता भागातील नांदेड सिटीत राहायला आहेत. आरोपी आणि व्यावसायिकाची २०२२ मध्ये ओळख झाली होती. त्यावेळी आरोपींनी त्यांच्या कंपनीत गुंतवणूक करण्याचे आमिष दाखविले होते. तक्रारदार व्यावसायिकाने सुरुवातीला २६ लाख रुपये आरोपींना गुंतवणुकीसाठी दिले. सप्टेंबर २०२३ पर्यंत आरोपींनी परतावा दिला. त्यानंतर आरोपींनी त्यांना परतावा दिला नाही. परतावा न दिल्याने त्यांनी रक्कम परत करण्यास सांगितले. मात्र, आरोपींनी त्यांना परतावा, तसेच मुद्दलही दिली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे साेपविण्यात आला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×