बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – रस्त्याने पायी जात असलेल्या ज्येष्ठाच्या गळ्यातील सोनसाखळी हातचालाखीने दुचाकीवर आलेल्या दोघांनी लांबवली. याप्रकरणी पाषाण येथील ७० वर्षीय नागरिकाने बाणेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना रविवारी (दि. २६) सकाळी साडेनऊच्या सुमारास पाषाण सुस रोडवरील फुटपाथवर घडली.
तरुणावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिक फुटपाथवरून पायी जात असताना, दुचाकीवरून दोन जण त्यांच्याजवळ आले.
एकाने त्यांच्या खांद्यावर हात ठेवत, ‘क्या अंकल किधर है, बहोत दिन हो गये मिले नही’ असे वक्तव्य केले. यावर ज्येष्ठाने ‘मै आपको जानता नही, आप कौन हो’ असे उत्तर दिले. त्यानंतर दुचाकीवर बसलेल्या दुसरा चोर खाली उतरून ज्येष्ठाच्या पाया पडला. त्याला देखील ज्येष्ठाने
‘मेरे क्यू पैर पड रहे हो, मै आपको जानता नही’ असे उत्तर दिले. त्यानंतर चोरांनी एक बिस्किटाचे पाकीट ज्येष्ठाच्या हातात देत तेथून जवळच असलेल्या एका मंदीरात दान करण्यास सांगितले. ज्येष्ठाने त्याला नकार देत, ‘मै नहीं करूंगा, तुम जाओ इधर से, आप ही मंदीर मे जाके दान
करो’ असे उत्तर दिले. त्यानंतरही दोघा चोरट्यांनी ज्येष्ठाच्या हातात बिस्किटाचे पाकीट देत, ते सुतारवाडीच्या दिशेने निघून गेले. दरम्यान, चोरांनी हातचालाखीने ज्येष्ठाच्या गळ्यातील १ लाख २० हजार रुपयांची सोन्याची चैन चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.
मार्केटयार्ड भागातील घरातून दागिन्यांसह लॅपटाॅप चोरी
पुणे – मार्केटयार्ड भागातील डाॅ. आंबेडकर वसाहतीत एका घरातून चोरट्यांनी दागिने, लॅपटाॅप असा एक लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना घडली. तरुणाने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी आणि कुटुंबीय डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत राहायला आहे. २५ ऑक्टोबर रोजी घराचा दरवाजा उघडा होता. दरवाजा उघडला असल्याची संधी साधून चोरटे आत शिरले. पोटमाळ्यावर कपाटात ठेवलेले एक लाख १७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, तसेच लॅपटाॅप असा एक लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून चोरटे पसार झाले. तरुणीच्या घरात चोरी करणारे चोरटे माहितगार असल्याचा संशय पोलिसंनी व्यक्त केला असून, पोलीस कर्मचारी सुरेखा अनपट तपास करत आहेत.





















