तरुणावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न
marathinews24.com
पुणे – किरकोळ वादातून दाेन गटात हाणामारी झाली. एकमेकांकडे पाहण्याच्या वादातून एका तरुणाच्या डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना धनकवडी भागात घडली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांकडून चौघांनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कात्रज भागात ३ दुकानांचा दरवाजा उचकटला; रोकड लंपास – सविस्तर बातमी
विकी बाळासाहेब कांबळे (वय २५,रा. शंकर महाराज वसाहत, धनकवडी) याला अटक करण्यात आली आहे. अविनाश महादेव घोडके (वय ३९, रा. ठाकर गिरणीसमोर, शंकर महाराज वसाहत, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोडके यांचे नातेवाईक अभिषेक नरसिंगे आणि आरोपी विकी कांबळे यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. घोडके यांनी कांबळे याला जाब विचारला त्यानंतर कांबळे आणि त्याचा भाऊ तेथे आले. २४ ऑक्टोबरला धनकवडीत आरोपी कांबळे याने घोडके यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. विकी कांबळे याने सहकारनगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, घोडके, त्याचा भाऊ, मेहुणी, मेहुणीच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोडके आणि साथीदारांंनी मारहाण केली, अशी फिर्याद परस्परविरोधी फिर्याद कांबळे याने दिली आहे. पोलीस हवालदार धोत्रे तपास करत आहेत.





















