भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – शहरातील कात्रज भागताील गुजरवाडी फाटा येथील तीन दुकानांचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी १ लाख ८ हजारांची रोकड लांबविल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. ओैषध विक्रेत्याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ महिलेचा मृत्यू; वाघोली भागात अपघात – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरवाडी फाटा परिसरात तक्रारदाराचे ओैषध विक्री दुकान आहे. शुक्रवारी रात्री त्यांनी दुकान बंद केले. शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी ओैषध विक्रीचे दुकानाचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. गल्ल्यातील १ लाख रुपये चोरट्यांनी चोरले. शेजारी असलेले किराणा माल विक्री दुकान, तसेच आणखी एका दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी एकूूण मिळून आठ हजारांची रोकड लांबविली. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी दुकानाच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण ताब्यात घेतले असून, पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत.





















