Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

छायाचित्रकारांनी नेहमी नावीन्याच्या शोधात राहिले पाहिजे – ज्येष्ठ छायाचित्रकार प्रशांत नाकवे

छायाचित्रकारांनी नेहमी नावीन्याच्या शोधात राहिले पाहिजे - ज्येष्ठ छायाचित्रकार प्रशांत नाकवे

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्‍घाटन

marathinews24.com

पुणे – पूर्वीच्या वृत्तपत्रांच्या छायाचित्रणामध्ये आणि आत्ताच्या कामामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. तंत्रज्ञान झपाट्याने बदलत असून दररोज नवीन साधने येत आहेत. डिजिटल नंतर आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर वाढला आहे. त्यामुळे लाइटरूमची जागा आता प्रॉम्टरूमने घेतली. या काळात छायाचित्रकारांनी नेहमी नावीन्याच्या शोधात राहिले पाहिजे,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ छायाचित्रकार प्रशांत नाकवे यांनी गुरूवारी ( दि.४ ) केले.

महाराष्ट्रात बेकायदेशीर धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्याची नागरिक सोशल फाउंडेशनची मागणी – सविस्तर बातमी 

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वर्धापनदिनानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथील कलादालनात छायाचित्र आणि व्हिडिओ प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. गुरूवारी (ता.४) ज्येष्ठ छायाचित्रकार प्रशांत नाकवे यांच्या हस्ते प्रदर्शानाचे उद्‍घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले आदी उपस्थित होते. नागरिकांना हे प्रदर्शन शनिवार (ता.६) पर्यंत विनाशुल्क पाहता येणार आहे.

नाकवे म्हणाले, ‘‘एआय पूर्णपणे शिकून त्याचा वापर करणेही तेवढेच गरजेचे आहे. एआयचा वापर वाढल्याने सत्य पडताळणीची (फॅक्ट चेक) आवश्यकता वाढत आहे. छायाचित्र किंवा व्हिडिओची सत्यता पडताळून पाहण्याचे कौशल्य प्रत्येकाने आत्मसात करण्याची गरज आहे. एआय शिकणार नाही, असा एककल्ली पणा सोडला पाहिजे. एककल्ली राहिलात तर या काळात माणूस बाहेर होतो. त्यासाठी छायाचित्रकारांनी आयुष्यभर शिकत राहावे. तर पत्रकार संघाची भूमिका मांडताना पाटील म्हणाले, ‘‘छायाचित्रकार हा नेहमी नेकक्या प्रश्नांवर बोट ठेवून समाजातील घडामोडी त्यांच्या छायाचित्रातून मांडत असतो. अनेकदा छायाचित्रच बोलत असते. त्यामुळे त्याबद्दल अधिक विस्तृतपणे मांडणी करण्याची गरज भासत नाही. समाजातील आरसा म्हणून छायाचित्रकार हे काम करतात.’’ तेजस टवलारकर यांनी आभार मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×