Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

गोल्ड फॉरेक्स ट्रेडींगमधील गुंतवणूक पडली १९ लाखांना

शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष पडले महागात

चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी घातला गंडा

marathinews24.com

पुणे – गोल्ड फॉरेक्स ट्रेडींगमधील गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी महिलेला तब्बल १९ लाखांचा गंडा घातला आहे. ही घटना १६ फेबु्रवारी ते ९ मार्च २०२४ कालावधीत कोथरूडमध्ये घडली आहे. याप्रकरणी ५० वर्षीय महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

एसटी प्रवासात साडेतीन लाखांचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कोथरूडमध्ये राहायला असून, १६ फेबु्रवारी २०२४ रोजी सायबर चोरट्यांनी त्यांना संपर्क केला. गोल्ड फॉरेक्स ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी केली. त्यानंतर सायबर चोरट्याने महिलेचा विश्वास संपादित करून त्यांना गुंतवणूकीला भाग पाडले. अवघ्या एका महिन्यात १९ लाखांची गुंतवणूक करण्यास लावून त्यांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अनिल माने तपास करीत आहेत.

जेष्ठाला पावणेचार लाखांचा गंडा

ऑनलाईनरित्या नेटफ्लिकचे रिजार्च करण्यासाठी सायबर चोरट्याने जेष्ठाला लिंक पाठवून ओटीपी टाकण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांच्या बँकखात्यातून ३ लाख ७६ हजार रूपये वर्ग करून घेत फसवणूक केली आहे. ही घटना २० सप्टेंबर २०२५ रोजी हडपसरमध्ये घडली आहे. याप्रकरणी ६१ वर्षीय नागरिकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक नीलेश जगदाळे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×