एसटी प्रवासात साडेतीन लाखांचे दागिने चोरीला

नेपाळी रखवालदाराच्या घरातून ३ लाखांचे दागिने लांबविले

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – एसटी प्रवासादरम्यान चोरट्याने तरूणाचे ३ लाख ५५ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना १६ ऑक्टोबरला सकाळी साडेनउच्या सुमारास आळेफाटा परिसरात घडली आहे. याप्रकरणी ३० वर्षीय तरूणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल चोरणार्‍या डिलीव्हरी बॉयला अटक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण आंबेगाव पठार परिसरात राहायला असून, १६ ऑक्टोबरला सकाळी नउच्या सुमारास एसटीने प्रवास करीत होता. आळेफाटा परिसरात नाष्टा करण्यासाठी तरूण उतरल्यानंतर गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या बॅगेतील ३ लाख ५५ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. आंबेगाव पठार परिसरात आल्यानंतर तरूणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×