अल्पवयीनाकडून पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त

अल्पवयीनाकडून पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त

पोलिसंच्या पथकाने सापळा लावून घेतले ताब्यात

marathinews24.com

पुणे – देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणार्‍या अल्पवयीनाला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, ३ काडतूस जप्त केले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या युनिट तीनमधील पोलीस कर्मचारी पंढरीनाथ शिंदे, तुषार किंद्रे हे सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी भागात गस्त घालत होते. त्यावेळी अल्पवयीन नर्‍हे-धायरी रस्त्यावर थांबल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर पोलिसंच्या पथकाने सापळा लावून त्याला ताब्यात घेतले.

मोलकरणीचा ७ लाखांच्या मंगळसूत्रावर डल्ला – सविस्तर बातमी  

अल्पवयीनाची झडती घेतली असता, त्याच्याकडे एक पिस्तूल आणि तीन काडतुसे सापडली. अल्पवयीनाने दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगल्याची माहिती तपासात मिळाली आहे. सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सहायक फौजदार मुकुंद तारू, कैलास लिम्हण, मोहम्मद शेख, किशोर शिंदे, अमित बोडरे, पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×