पुण्यातील कुख्यात आंदेकर टोळीला पोलिसांचा दणका; ३७ लाखांचा ऐवज जप्त

मोक्कातील आरोपी अटकेत, पिस्तूलांसह शस्त्रसाठाही जप्त

marathinews24.com

पुणे – दहशतीच्या जोरावर ताबामारीसह गुन्हेगारी करणार्‍या कुख्यात बंडू आंदेकर टोळीला पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकांनी दणका दिला आहे. मोक्कात दोन वर्षांपासून पसार असलेल्या आरोपीला कोल्हापूरमधून बेड्या ठोकल्या आहेत. तर अल्पवयीनाकडून दोन पिस्तूलांसह कुकडी असा १ लाख ३५ हजारांचा शस्त्रसाठा जप्त करीत घरातून सोने-चांदी, रोकड असा ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गाडी पार्किंगच्या वादातून केला वार, कुटूंबियांनाही मारहाण – सविस्तर बातमी

गणेश उर्फ सुरज अशोक वड़ा (वय ३० रा. मंगळवार पेठ) असे कोल्हापूरातून अटक केलेल्याचे नाव आहे. खंडणी विरोधी पथक दोन फरारी आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी मोक्कातील दोन वर्षांपासून पसार पाहिजे आरोपी गणेश वडा हा कोल्हापूरातील कुरतामध्ये असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक गौरव देव आणि दिलीप गोरे यांना मिळाली. पथकाने कोल्हापूरमध्ये धाव घेत त्याला ताब्यात घेत अटक केली आहे. तसेच खंडणी विरोधी पथक एकमधील पोलीस अमलदार अमोल आव्हाड व मयुर भोकरे यांना आंदेकर टोळीशी संपर्कात असलेल्या अल्पवयीनाकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाल्याने त्याला ताब्यात घेतले.

अल्पवयीने त्याच्याकडील पिस्तूल दुसर्‍या मित्राकडे ठेवायला दिल्याचे सांगितले. तो कुख्यात आंदेकर टोळीतील तुषार वाडेकर याच्या घरामध्ये राहत असल्याचे सांगितले. पथकाने अल्पवयीनाकडील दुचाकीच्या डिकीतून दोन पिस्तूलांसह कुकरी मिळून आली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, एसीपी विजय कुंभार, एसीपी राजेंद्र मुळीक, एसीपी शंकर खटके, पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख, पोलीस निरीक्षक आश्विनी जगताप, पोलीस निरीक्षक अजित जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, एपीआय राजेश माळेगावे, उपनिरीक्षक गौरव देव, उपनिरीक्षक राम पारवे, उपनिरीक्षक राहुल मखरे, नीलेश साबळे, अनिकेत बाबर यांनी केली.

आरोपींच्या घरातून मिळाले लाखोंचे घबाड

कुख्यात बंडु आंदेकर टोळीतील गुंड तुषार वाडेकर आणि स्वराज वाडेकर याच्या हिच आईची इच्छा’ घरातून पथकने १८ लाख ८५ हजारांचे चांदीचे दागिने जप्त केले. तसेच सुर्यकांत आंदेकर, वनराज आंदेकर, कृष्णराज आंदेकर यांच्या नावावर असलेले आयकर विवरण कागदपत्रे, जमिनीसह दुकानाच्या संदर्भातील करारनामे, वनराज असोसिएटस प्रमोटर्स बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स भागीदारी संदर्भातील कागदपत्रे, महेश महिला नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवींच्या पावत्या, इतर मालमत्ते संदर्भातील कागदपत्रे, तब्बल १७ लाख १५ हजारांची रोकड जप्त केली.

गुंड बंडू आंदेकर टोळीतील पसार गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या पथकांनी कोल्हापूरमधून अटक केली आहे. तर संबंधित टोळीशी संपर्कात असलेल्या अल्पवयीनाकडून दोन पिस्तूले, कुकरी असा शस्त्रसाठा जप्त केला आहे. तसेच आरोपींच्या घरझडतीत रोकड, चांदीचे दागिने, करारपत्रे, ठेवींच्या पावत्या मिळून आल्या आहेत. – पंकज देशमुख, अपर पोलीस आयुक्त, पुणे शहर

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×