पुण्यात पोलिसांकडून दरदिवशी २ तासांची नाकाबंदी

पुण्यात पोलिसांकडून दरदिवशी २ तासांची नाकाबंदी

प्रत्येक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत होतेय वाहनांची तपासणी

marathinews24.com

पुणे – पोलीस आयुक्तालयाीत प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरदिवशी २ तास पोलीस नाकाबंदीला सुरूवात झाली आहे. कायदा सुव्यवस्थेसह महापालिकेच्या आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी करत वाहन तपासणी केली जात आहे. त्याद्वारे आरोपींसह गुन्हेगारांची पडताळणी करण्यात येत असून, सुरक्षिततेला बळकटी निर्माण करण्यास प्राधान्य दिले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार प्रत्येक ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी केली जात असल्याची माहिती सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली आहे.

पुणे पोलीस आयुक्तांचे पीआरओ निलंबित; बडतर्फीची प्रक्रिया सुरू – सविस्तर बातमी  

नागरिकांच्या सुरक्षिततेला बळकटी निर्माण करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयातंर्गत असलेल्या ४४ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत महत्वाचे चौक, वर्दळीच्या ठिकाणांवर दरदिवशी २ तास संबंधित पोलीस ठाण्यांकडून नाकाबंदी करण्यात येत आहे. विशेषतः परिमंडळ पोलीस उपायुक्तांकडून नाकाबंदीचा आढावा घेउन वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना रिपोर्ट करण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे विविध भागात वर्दळीच्या ठिकाणांसह गर्दीच्या ठिकाणी सकाळी किंवा संध्याकाळच्या सुमारास नाकाबंदी केली जात आहे. दरम्यान, पोलिसांच्या उपस्थितीमुळे परिसरातील आजूबाजूच्या किरकोळ वादविवादाच्या घटनांनाही आळा बसला आहे.

चौकात आता वाहनांची तपासणी

नामांकित चौकासह नागरिकांची गर्दी असलेल्या ठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी केली जात आहे. त्याद्वारे संशयितांची तपासणी करणे, गुन्ह्यातील आरोपींची माहिती नोंद करणे, मोक्का, तडीपार गुन्हेगारांविरूद्ध कारवाई केली जात आहे. दरम्यान, प्रत्येक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने २४ तासापैकी २ तास हद्दीत नाकाबंदी लावण्याची जबाबदारी घ्यावी. त्यानंतर संबंधित पोलीस उपायुक्तांनी त्यासंदर्भात खातरजमा करून वरिष्ठांना माहिती द्यावी. त्याचा अहवाल वरिष्ठ अधिकारी कार्यालयाला जमा करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.

नागरिकांच्या सुरक्षिततेला बळकटी निर्माण करण्यासह महापालिकेच्या आगामी निवडूणकीमुळे प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरदिवशी दोन तास नाकाबंदी केली जात आहे. त्याद्वारे संशयितांची तपासणी करण्यावर भर दिला आहे.- रंजनकुमार शर्मा, सहपोलीस आयुक्त, पुणे शहर

महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदीदरम्यान संशयितांची तपासणी करणे, चौकात पोलीस दिसल्यामुळे संभाव्य अनुचित प्रकार टळण्यास मदत होत आहे.- अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×