Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

सीबीआय अधिकारी असल्याची केली बतावणी; ८ लाखाची फसवणूक

लग्नाची मागणी घातली अन् ८ लाखांची फसवणूक केली

marathinews24.com

पुणे – सीबीआय अधिकारी तसेच लायसन्स इंटरनॅशनल इथिकल हॅकर असल्याचे भासवून एकाने लग्नाची मागणी घातली. त्यानंतर विविध कारणांनी महिलेकडून ४ लाख ८० हजार रुपये घेऊन ते परत न देता फसवणूक केली. याप्रकरणी ४२ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून वानवडी पोलिस ठाण्यात तोतया विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरीष जयंतीलाल गोहेल उर्फ चिराग मित्तल (२७, रा. ससाणेनगर, पुजाप्रसाद अपार्टमेंट, हडपसर) असे आरोपीचे नाव आहे.

वाहनचोरी करणारा अल्पवयीन ताब्यात, ४ दुचाकी जप्त – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४२ वर्षीय महिलेला १७ जुलै २०२४ ते २३ जुलै २०२५ या कालावधीत आरोपीने सोशल मीडियाद्वारे ओळख झाली. स्वत:ला सीबीआय अधिकारी असल्याचे आरोपीने भासवले. लायसन्स इंटरनॅशनल इथिकल हॅकर असल्याचीही
बतावणी केली. त्यानंतर त्याने महिलेला लग्नाची मागणी घातली. काही दिवसांनी आरोपीने स्वत:च्या हृदयाचे ऑपरेशन आणि बहिणीच्या बाळंतपणासाठी महिलेकडून ४ लाख रुपये घेतले.

हे पैसे फातिमानगर परिसरात चेक, रोख स्वरूपात त्याने घेतले. त्यानंतर पुन्हा महिलेच्या दोन अंगठ्या फायनान्स कंपनीकडे गहाण ठेवून ८० रुपये घेतले. पैसे दिल्यानंतर काही दिवसांनी महिलेला संबंधित इसमाने खोटं बोलून फसवल्याचे निदर्शनास येताच तिने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आशिष जाधव करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×