Breking News
Robotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूकPune Crime News : पैसे परत मागितल्याने तरुणावर कोयत्याने वारPune Bank Loan Fraud : जय भवानी सहकारी बँकेत साडेचार कोटींचा कर्ज घोटाळाMobile Theft in Pune : नवले पुलाजवळ तरुणाचा मोबाइल हिसकावलाPune Bank Fraud Case : नियमबाह्य कर्ज प्रकरणात बँकेची ४ कोटी ४६ लाखांची फसवणूकPune Road Accident News : लोणी काळभोरमध्ये ट्रकवर मोटार आदळली; मोटार चालक मृत्युमुखीNavi Peth Crime News : आर्थिक व्यवहारातून तरुणाचा खुनाचा प्रयत्नWarje Crime News : गांजा विक्री करणारी महिला अटकेत

तालुक्यात कीटकजन्य आजार प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु-डॉ. मनोज खोमणे

तालुक्यात कीटकजन्य आजार प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु-डॉ. मनोज खोमणे

आठवड्याभरात ८ हजार ४०० घरांचे सर्वेक्षण

marathinews24.com

बारामती – पावसाळा ऋतूमधील वातावरणातील बदल आणि पारेषण काळ असल्याने किटकजन्य आजारांचा धोका वाढू नये, याकरिता तालुक्यासह बारामती, माळेगाव नगरपंचायत हद्दीत आरोग्य विभागामार्फत कंटेनर सर्वेक्षण, धूरफवारणी करण्यासह माहिती पत्रकाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.

लंपीच्या पार्श्वभूमीवर पशुधनाचे लसीकरण करुन घेण्याचे पशुसंवर्धन विभागाचे आवाहन – सविस्तर बातमी 

तालुक्यामध्ये १२० पथकामार्फत या आठवड्यात ८ हजार ४०० घरांचे सर्वेक्षण केले असता त्यामध्ये ७९ घरांमध्ये डासांच्या आळ्या आढळून आल्या, या भागात आरोग्य कर्मचारी, आशा सेविकांमार्फत सर्वेक्षण करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. डासोत्पती स्थानात गप्पी मासे सोडण्याची मोहीम राबविली जात आहे, डेंगू सदृश्य रुग्ण आढळून आल्यास त्या भागात कटेनर सर्वेक्षण करून ग्रामपंचायत व नगरपरिषदेमार्फत त्वरीत धूरफवारणी करण्यात येत आहे तसेच घंटागाडी (कचरागाडी ) वर ध्वनीफीतद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत रुग्णांचे रक्तनमुने घेण्यात येऊन त्वरीत प्रयोगशाळेतून तपासणी करिता पाठविण्यात येत आहे.

नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा, साठविण्यात आलेले पाणीसाठे रिकामे करावेत. सात दिवसाच्या आत पाणीसाठे रिकामे करुन ते स्वच्छ कोरडे करून पुन्हा वापरात आणावेत. ताप आल्यास त्वरीत जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, सर्व शासकीय दवाखान्यात मोफत आजाराचे निदान, उपचार घ्यावेत, प्रशासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करुन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×