Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

परिवहन वाहनांसाठी सुरु होणाऱ्या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी प्रक्रिया सुरू

परिवहन वाहनांसाठी सुरु होणाऱ्या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी प्रक्रिया सुरू

खाजगी वाहनांना आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक विहित शुल्क तीनपट आकारले जाणार

marathinews24.com

पुणे – प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे मालवाहतूक, टुरिस्ट टॅक्सी, बस व ॲम्बुलन्स या परिवहन संवर्गातील वाहनांसाठी नवीन नोंदणी मालिका सुरु करण्यात येत आहे. यासाठी ज्यांना खाजगी वाहनांना आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक विहित शुल्क (तीनपट व नियमित शुल्क) भरून हवे असतील त्यांनी 13 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 2.30 या दरम्यान डीडी, पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र व पॅनकार्डच्या साक्षांकित प्रती जोडून जमा करावा.

काँग्रेसने सोडवला प्रभाग ३८ मधील महाविकास आघाडीतील पेच – सविस्तर बातमी 

एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्यांची यादी 14 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल व त्याच दिवशी दुपारी 4.30 वाजता लिलाव प्रक्रिया करण्यात येईल.

एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. राखीव नोंदणी क्रमांक मिळाल्यानंतर 180 दिवसांच्या आत वाहन नोंदणीसाठी सादर न केल्यास संबंधित क्रमांक आपोआप रद्द होईल व भरलेली फी शासन खात्यात जमा होईल. कोणत्याही परिस्थितीत राखीव नोंदणी क्रमांकाकरिता भरलेली फी परत न करण्यात येणार नाही तसेच तिचे कोणतेही समायोजन करता येणार नाही. असे उप प्रादेशिक परिहवन अधिकारी पुणे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×