Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

रहिवासी प्रयोजनार्थ कुटुंबाना जागा पट्टे वाटपाची कार्यवाही सुरु-जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

रहिवासी प्रयोजनार्थ कुटुंबाना जागा पट्टे वाटपाची कार्यवाही सुरु-जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

नागरिकांनी सहभागी होऊन विविध सेवांचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आवाहन 

marathinews24.com

पुणे – ‘महसूल सप्ताह २०२५’ निमित्ताने जिल्ह्यात शासकीय जागेवर सन २०११ पुर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या पात्र कुटुंबांना नियमित करण्याच्या अनुषंगाने जागांचे पट्टे वाटप करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली. जुन्नर तालुक्यात एकूण १२ मंडळ भागातील शासकीय जागेवर २०११ पासून अतिक्रमण असलेली संख्या एकूण ७६४ आहेत, खेड तालुक्यात सर्वेक्षण करणेची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

अतिरिक्त न्यायदंडाधिकारी बाल न्याय मंडळाच्या इमारतीचे उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या हस्ते उद्घाटन – सविस्तर बातमी 

आमदार सुनील शेळके आणि तहसीलदार यांच्या उपस्थितीत मावळ येथे मौजे शिंदेवस्ती, ठाकर वस्ती, सोमाटणे फाटा, तळेगाव दाभाडे येथे वन जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्यात आले. अपर तहसील पिंपरी चिंचवड अंतर्गत देहू नगरपंचायत हद्दीतील मौजे विठ्ठलवाडी येथील सर्वे क्रमांक २ या शासकीय जागेमध्ये रहिवाशी प्रयोजनार्थ ६३४ कुंटुंबाचे अतिक्रमण असल्याचे आढळून आले आहेत.

अप्पर तहसील लोणी काळभोर अंतर्गत मंडळ अधिकारी थेऊर यांच्यावतीने नायगाव व कदमवाकवस्ती येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करून घरकूल मंजूर करणे, त्याअनुषंगाने प्रस्ताव, आवश्यक कागदपत्राबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिरूर तालुक्यातील प्रत्येक मंडल भाग स्तरावर शासकीय जागेवर रहिवासी प्रयोजनार्थ असलेल्या अतिक्रमणाबाबत यादी तयार करण्याचे काम सुरु आहे.

पुरंदर तालुक्यात रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबापैकी दोन लाभार्थ्यांना अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करण्यात आले. दौंड तालुक्यातील मौजे दहिटणे वाखारी दापोडी या ठिकाणी घरकुल लाभार्थ्यांना पट्टे वाटप करण्याच्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले आहे. महसूल सप्ताहानिमित्त प्रशासनाच्यावतीने गाव पातळीवर जनजागृती करण्यात येत आहे, नागरिकांनी सहभागी होऊन विविध सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×