Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

पिंपरी चिंचवड शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

पिंपरी चिंचवड शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू

marathinews24.com

पुणे – आगामी काळात साजरे होणारे सण, उत्सव, क्रांतिवीर लहुजी साळवे पुण्यतिथी व वासुदेव बळवंत फडके पुण्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१)(३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. हे आदेश १७ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहतील.

पोलीस बनण्याचे स्वप्न अधूरे; भरतीदरम्यान तरुणाचा मृत्यू – सविस्तर बातमी 

या आदेशान्वये कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, ज्वलनशील द्रव पदार्थ बाळगणे,दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने तसेच काचेचे तुकडे व काचेच्या रिकाम्या बाटल्या बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे, शस्त्रे, सोटे, भाले, चाकु, सुरा, कोयता, तलवारी, दंड, काठया, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे, पुढाऱ्यांच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, मोठमोठयाने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा आविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे या कृत्यावर बंदी घालण्यात आली आहे.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ च्या कलम ३७ चे पोटकलम (३) प्रमाणे पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास तसेच पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांचे पुर्व परवानगी शिवाय सभा घेणेस किंवा मिरवणूक काढण्यास बंदी मनाई राहील. वरील आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधीत व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल, असे पिंपरी चिंचवड पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×