Breking News
Pune Rain Update : पुण्यात रिमझिम पावसाला सुरुवातपुणे महापालिकेच्या सर्व्हर रूममधून कॉम्प्युटरची हार्ड डिस्क चोरीलापर्वती परिसरात सिक्युरटेक कंपनीची १९ लाखांची फसवणूकगाडी चालकावरून झाला वाद; डोक्यात घातला दगडदारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा

पुण्यात नव्याने ५ पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव

पुण्यात नव्याने ५ पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव

लोहगाव, नर्‍हे, मांजरी, लक्ष्मीनगर, येवलेवाडीत प्रस्तावित ठाणी

marathinews24.com

पुणे – पुण्यात नव्याने ५ पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव – शहरातील वाढत्या लोकसंख्यासह गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर नव्याने आणखी पाच पोलीस ठाण्यांची निर्मिती केली जाणार आहे. संबंधित नवीन पोलीस ठाण्यांची हद्द निश्चित झाली असून, त्याचा प्रस्ताव पुणे पोलिसांनी नुकताच गृह विभागाकडे पाठविला आहे. त्यानुसार लोहगाव, नर्‍हे, मांजरी, लक्ष्मीनगर (येरवडा), येवलेवाडी (उंड्री) अशा पाच नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती केली जाणार आहे. त्यासोबतच आणखी ७ पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांची पदे निर्मितीचा प्रस्ताव पाठविला आहे.

औंध, बालेवाडी व खडकी परिसरात चोरीच्या वाढत्या घटनांवर तात्काळ कारवाई करण्याची माजी नगरसेवक सनी निम्हण यांची पोलिस आयुक्तांकडे मागणी – सविस्तर बातमी 

पुणे पोलीस आयुक्तालयातंर्गत असलेल्या मोठ्या पोलीस ठाण्यांची विभागणी करीत वर्षभरापूर्वी ७ नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा पाच ठाण्यांची उभारणीसाठी शासनाला प्रस्ताव सादर केला आहे. नवीन पोलीस ठाणी, चौक्यांमुळे पोलीस दलाचे कामकाज सक्षम होणार आहे. नवीन पोलीस ठाण्यांसह अतिरिक्त मनुष्यबळाची गरज भासणार आहे. पुणे पोलीस दलात पोलीस उपायुक्त दर्जाच्या सात अधिकार्‍यांची पदे मंजूर करावी, असे प्रस्तावात नमूद केले आहे. संबंधित प्रस्तावाला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वतः मंजुरी दिली आहे

७ वरिष्ठ अधिकारी अन ७ परिमंडळे

वाहतूक शाखेत आणखी दोन पोलीस उपायुक्त, पोलीस मुख्यालयात दोन उपायुक्त, सायबर गुन्हे शाखेत दोन उपायुक्त, विशेष शाखेत एक उपायुक्तांची आवश्यकता आहे. गृह विभागाकडे पोलीस उपायुक्त दर्जाच्या ७ अधिकार्‍यांची पदे मंजुर करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, आयुक्तालयांर्गत सध्या पाच परिमंडळे असून, पोलीस दलाचे कामकाज गतिमान करणे, नागरिकांच्या तक्रारींचा निवारणासाठी परिमंडळाचे विभाजन करुन ७ परिमंडळाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून, प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविला आहे.

नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती

– विमानतळ ठाण्यातून लोहगाव पोलीस ठाणे
– नांदेड सिटी ठाण्यातून नर्‍हे पोलीस ठाणे
– हडपसर ठाण्यातून मांजरी पोलीस ठाणे
– येरवडा ठाण्यातून लक्ष्मीनगर पोलीस ठाणे
– कोंढवा ठाण्यातून येवलेवाडी पोलीस ठाणे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×